पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/664

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तंतूंच्या क्रियेचे "स्तंभन" करण्याचा आहे. म्हणून Bromine ला स्तंभ हे नांव योजिले आहे. ह्याच नियमानें अद, प्लव, हे शब्द ठरविले आहेत. मग्न हा शब्द ह्याच नियमाखाली घालत येईल.

नियम पांचवा-नामसंख्या चार. प्राण, नत्र (न त्रायते इति), हर, आणि स्फुर. हे शब्द Oxygen, Nitrogen, Chlorine आणि Phosphorus ह्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रधान धर्मा वरून आम्ही योजिले आहेत. नियम साहावा-नामसंख्या एक. ('पलाशस्य इदं' इति.) पालाश हा शब्द Potassium ला योजिला आहे. कारण Potas-siun हे पलाशाच्या किंवा पानांच्या राखेपासून निघते .

नियम सातवा-नामसंख्या तीन-कांही पण अगदीच थोड्या ठिकाणी इंग्रजी नांवांच्या लॅटिन किंवा ग्रीक धातूना संस्कृत वर्णोच्चाराचे रूप देऊन तेच धातुशब्द कायम केले आहेत; जसें, Chromium (Gr chrome, colour ) चे कुम हे नांव ठेविले आहे. त्याचप्रमाणे कर्ब आणि काद्य हे शब्द योजिले आहेत.

नियम आठवा-नामसंख्या चवतीस. इंग्रजी शब्दाना फक्त संस्कृताचे वर्णोच्चाररूप दिले आहे; जसे, " आर्गन, बिस्मत, श्याम, कोबल्ट, कोलंब, अर्व, गादोलिन, इंद, क्रिस, लंथन, मंगल, मोलद, न्योदिम, निकिल, ओस्म, पलाद, प्लातिन, प्रास्युदिन, रद, र्हद, रूपद, रुथेन, सामर, स्कंद, तंतल, थाल्ल, थुर, थुल, तितन, तुंगस्थ, यितर्व,' यित्र, आणि जिर्कन. नियम नववा-नामसंख्या एक. ताल. हरतालासाठी संस्कृतांत ताल हा शब्द वापरतात. हरतालाचा मुख्य जे Arsenic नांवाचें मूल तत्व त्यालाही आम्ही 'ताल' हाच शब्द योजिला आहे. कारण त्यापेक्षा " लहान शब्द करणे शक्य नाही.

मूलतत्वांच्या रासायनिक संज्ञा. बहुतेक ठिकणी त्या शब्दाचे पहिले अक्षर योजलें आहे. काही ठिकाणी दुसरे किंवा तिसरे अक्षर योजिले आहे. काही ठिकाणी पहिली दोन्ही अक्षरें ठेविली आहेत.

ӿ भारसंज्ञापद्धति. ही संज्ञापद्धति निरनिराळ्या तत्वांच्या परमाणुभारांकास धरून बसविली आहे. ज्या ठिकाणी ह्या पद्धतीप्रमाणे वर अमुक एक द्रव्यापुढें संज्ञा लिहिलेली नाही तीपुढें Periodic शब्दाखाली ह्या पद्धतीवरून ठरविलेल्या संज्ञाकोष्टकांत आम्ही देणार आहो. वर दिलेली क (Lithium), ग (Sodium ), कि ( Potassium ), गि (Copper), कु (Rubidium ), गु (Silver ), के ( Cæsium ), गो (Gold) ही एकाच समानगुणधर्माच्या वर्गाची आहेत, व त्यांच्या संज्ञा क वर्गातील अक्षरांनी ठरविल्या आहेत. जास्त माहितीकरितां Periodic शब्द पाहा.