पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/663

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नियम पहिला. नामसंख्या नऊ. स्वर्ण (सुवर्ण), रजत, ताम्र, सीस, लोह, वंग, जशद (जस्त), गंध (गंधक), पारद हे जुने सर्वांना माहीत असलेले शब्द जसेच्या तसेच ठेविले आहेत.

नियम दुसरा.-नामसंख्या चार. जी इंग्रजी नांवें स्थलांवरून पडली आहेत. ती संस्कृत व्याकरणाच्या नियमांशी जुळविण्यास थोडीशी बदलून तशीच ठेविली आहेत. जसें, Strontium = स्त्रान्त (संते भवः, स्त्रंतदेशांत सांपडलेला). त्याचप्रमाणे गाल्ल, शार्मण्य, नार्व.

नियम तिसरा-नामसंख्या दहा. काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचे संस्कृत भाषांतर केले आहे; जसें, Lithium (Gr. lithos, stone.) ला 'ग्राव' हे नांव योजिले आहे. ह्याच रीतीने सोम, ऐंद्र, वनाट, श्रीक, वरुण, भार, सौर, (उदज) उज्ज, भौम, ही नांवें योजिली आहेत. पुढें कोशांत ज्या ज्या ठिकाणी ती द्यावी लागतील तेथे तेथे त्यांचे स्पष्टीकरण आह्मी करणार आहो.

नियम चवथा-नामसंख्या अकरा. कांही मूलतत्वांची नांवें यांपासून होणा-या अतिशय प्रसिद्ध अशा संयुक्त पदार्थाच्या नांवांतील (क, १) क्रियावाचकधातूवरून किंवा (क, २) मूल नामावरून, किंवा (ग) त्या पदार्थांचा प्रधानधर्म दाखविणा-या शब्दांतील क्रियावाचकधातूवरून ठरविली आहेत :

क. (१) अंजनाचा मुख्य घटक Antimony ही धातु आहे, म्हणून Antimony ला अंज हे नांव योजिले आहे. Antimony ही धातु अविकृत असल्यामुळे अंज ही क्रियापदधातु अविकृत ठेविली आहे. व्यवहाराच्या सोईकरितां अंज हा व्यंजनांत शब्द अंज असा स्वरान्त लिहिलाआहे. ह्याच नियमानें स्फट, टंक, खट, सिक, हे शब्द योजिले आहेत. स्फट ( Aluminium) ही स्फटिकी (Alum) चा मुख्य घटक आहे. टंक (Boron) ही टांकणखारा (Borax) चा मुख्य घटक आहे. Silicon (सिक) हा सिकतेचा मुख्य घटक आहे. स्फद, टंक आणि सिक् हे स्फटिकी, टंकण, आणि सिकता ह्यांतील क्रियापदधातु असल्यामुळे स्फट, टंक आणि सिक ही नांवे आह्मीं योजिली आहेत. व ह्याच धोरणाला अनुसरून खट शब्दाची योजना केली आहे. खट ( Calcium ) हा खटिके (chalk )चा मुख्य घटक आहे. क. (२) सैंधव हा शब्द सिंधु शब्दापासून झाला आहे, व वैदूर्य हा शब्द विदुर शब्दापासून झाला आहे. सिंधु किंवा सिंध (Sodium) हे मूलतत्व सैंधवाचा मुख्य घटक आहे ; म्हणून सिंधु किंवा सिंध हे नांव Sodium ला योजिले आहे ; त्याचप्रमाणे Beryllium (विदुर) हे मूलतत्व (Beryl) वैदूर्याचा मुख्य घटक आहे, म्हणून Beryllium ला विदुर हे नांव योजिले आहे.

(ग) Bromine पासून झालेल्या Bromide चा धर्म ज्ञान-