पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/659

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्राचे पुस्तक n. Chemical a. (v. N.) रसायनशास्त्रासंबंधी-विषयक, रसायनशास्त्राने केलेला, रासायनिक Chem'ically adv. Chem'icals n. pl:. रसायनप्रयोगात उपयोगी पडणारी द्रव्ये n. pl., रसायनद्रव्ये n. pl. Chem'ism n. रासायनिक क्रिया f. Chemist n. मूलद्रव्यशास्त्रवेत्ता m, रसायनशास्त्रवेत्ता m, रसायनज्ञ-विद, रसायनशास्त्रज्ञ, रसायनी m. २ रासायनिक औषधे तयार करणारा व विकणारा. Chemical action n. रासायनिक क्रियाकर्म n. C. affinity रसायनप्रीति f. C. analysis रासायनिक पृथक्करण. C. attraction रसायनाकर्षण. C. change रासायनिक विकृति-विकार रूपांतर. C. combination रासायनिक-रसायनसंयाेग C. composition रासायनिक-रसायन-घटना. C. constituents of plants रसायनशास्त्रदृष्टया वनस्पतींचे घटकावयव. C. equation रासायनिक समीकरण. C. equivalents संयोगप्रमाणे, सममूल्यप्रमाणे. C. formula रासायनिक सूत्र n, नियम m, सारणी f. C. laboratory, see Laboratory. C. mixture रासायनिक मिश्रण n. C. names रासायनिक संज्ञा f. C. nomenclature रासायनिक संज्ञापद्धति f.C. notation रासायनिक घटनालेखनपद्धति f. physics रासायनभौतिकशास्त्र n. C. substitution रासायनिक घटकांतर. C. symbols शास्त्रांतील मूलद्रव्यांची पारिभाषिक चिन्हें-संज्ञा. C. technology रासायनिकलाविज्ञान n, रसायनकलाविज्ञान n. C. theory रासायनिकवाद m. पत्ति f. C. works रसायनें-रासायनिक पदार्थ करण्याचा कारखाना m. Inorganic Chemistry जड-असे-तन रसायनशास्त्र n, निरिंद्रीयरसायनशास्त्र n, Organic chemistry चेतनरसायनशास्त्र-सेंद्रियरसायनशास्त्र n. Physiological chemistry इंद्रियविज्ञानरसायनशास्त्र n. Practical Chemistry कर्तव्यरसायनशास्त्र n. रसायनक्रियाशास्त्र, उपयुक्त रसायनशास्त्र, व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र n. Pure chemistry तात्विक रसायनशास्त्र, रसायनसिद्धांत.

रसायनशास्त्रावर पुस्तकें लिहितांना पारिभाषिक शब्दसंबंधाने ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणींचा समग्र विचार करून खालील परिभाषा डाक्तर मोरेश्वर गोपाळ ऊर्फ नानासाहब बी. ए., बी. एस्. सी., एम्. डी., व प्रोफेसर त्रिभुवनदास दास गज्जर एम्. ए., बी. एस्. सी., ह्यांनी ठरविली आहे. ठरवितांना प्रोफेसर बाळाजी प्रभाकर मोडक, यांचा शास्त्रावरील पुस्तकें, प्रोफेसर राय यांचा हिंदुरसायनशास्त्राचा हास, रा. मोरो भिकाजी आगाशे, बी. ए., एल. एल. बी. या विषयावरील ग्रंथमालेतील निबंध व कलकत्त्यीतील साहित्य-सभेचा या विषयावरील प्रयत्न इत्यादि उपलब्ध साधनांचा पूर्ण विचार केला आहे; व अशा पूर्ण विचाराने ठरलेली परिभाषा बनारस येथील नागरीप्रचारिणी सभेने मान्य केल्यामुळे सभेच्या व आमच्या परिभाषेत अगदीच थोड्या ठिकाणी आता फरक राहिला आहे.

See Next Note.