पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/654

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f- &c. पडणें-उतरणे कमी होणे-हलकावणे-मंदावणे, &c. Cheaply adv. (v. A.) स्वस्ताईनें, सवंगाईनें, थोडक्यामोलने. Cheap'ener n. (obs.) Cheap'ness n. (v. A.) स्व(स) स्ताई f, सवंगाई f, मंदी f, अल्पमूल्यता f. ) Cheap Jack or John आडगिहाइकी माल स्वस्त विकणारा. २(फार स्वस्त माल देण्याचा आव घालणारा) फेरीवाला. Cheap labour n. स्वस्त मोलाची मजुरी, हलकी मजुरी (opposed to भारी मजुरी). Cheap trip n. (आगगाडीने किंवा आगबोटीने) नेहेमीपेक्षा थोड्या भाड्यांत केलेली स्वस्त सफर f. Cheap tripper n. (ठरीव दरापेक्षां) कमी भाड्यांत सफर करून येणारा. Dog cheap or Dirt C. colloq. अतिशय स्वस्त, पैशापायली, पैसापासरी, पैशा शेराचा, मातीच्या मोलाचा, idio. टक्काशेर. To become C. स्वस्तावणे, सवंगणे, सवंग होणे. To be dirt C. idio. अति स्वस्त असणे, वाटेवर पडणे, मातीचे मोलाने विकणे-देणे-जाणे. To be cheap of any thing (Scot. ) एखाद्यास (शिक्षा, बक्षीस वगैरे) जितकी मिळावयास पाहिजे होती त्यापेक्षा कमी मिळणे. To hold cheap, to hold of small account, to think little of, to despise अल्प महत्वाचा समजणे, कमी किंमतीचा समजणे, विशेष पर्वा न करणे.
Cheat (chāt) [short for Escheat, lands or tenements that fall to a lord or to the state by forfeiture, or by the death of the tenant without heirs; the escheaters often resorted to fraud to procure escheats ; hence the verb 'to cheat' which means 'to defraud', see Escheat.] v. t. to defraud, to trick, to swindle चकविणे, फसविणे, तुरी देणे, प्रतारणे, टोपी घालणे, मुंडवण.f. घालणे, धत्तुरा m. दाखविणें slang; as, To C. a person of or out of something. २ भुलथाप-झोंका देणे, मोह-भुरळ घालणे; as, To C. winter of its dreariness. [To C. and give the alip हुल मारणे, बाल्या देणे-मारणे-हाकणे.) C.v.i. ठकबाजी करणे, लबाडी करणे; as, To C. at cards. C. n. a fraud, a tricks, imposture कपट n, फसवण f, ठकवण f, फटवण f, वंचना f. २ a cheater, an impostor ठक, दगेबाज, प्रतारक, वंचक, फसव्या, ठकव्या, ठकबाज. ३ bot. शेतांत धान्यामध्ये उगवणारे गवत n. Cheated p. ठकविलेला, फसवलेला, &c., वंचित, प्रतारित Cheat,er n. फसवणारा, फसव्या, ठक(ग), ठकबाज, वंचक, प्रतारक. Cheatery n. colloq. कपट n, वंचना f, फसवणे n; &c, “ Much room for exaction, cheatery and litigation." २ law ठकबाजी f. Cheating n. (v. V. )-act ठकवणे n, फसवणे m, ठकवणी f, ठकवणूक f, slang धत्तरा m, ठकबाजी f, वंचन n, वंचना f, प्रतारण n, प्रतारणा f. To put a cheat upon फसविणे. Tame cheater Shakes. पाश, जाळे,प्रलोभन.२ फसवून जाळ्यांत नेणारा प्राणी m.

Check (chek) [ O. E. chek, O. Fr. eschec, Fr. echec. a stop, hindrance, orig. check in the game of chess. pl. echecs, chess, through Ar. from Per. shah,