पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/651

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाकलुन देणे. ४ to put to flight पळावयास लावणे. ५ शोध लावणे. C. v.i. to give chase-ची पाठ पुरविणे; as, To C. around after a doctor. C. n. शिकारीस जाणे n. २ that which is pursued शिकार f, मृगया f, सावज n. 3 the ground abounding in game मृगयाभूमि f, शिकारीचें मैदान n. Chase-port n. गल. बताच्या मागल्या बाजूनें बंदूक सोडण्याचा भाेंसका m. Beasts of chase शिकारीची जनावरें,(ससा, हरिण, कोल्हा, बगळा इत्यादि) शिकारीची सावजें. Wild-goose chasae fig. व्यर्थ खटाटोप, सुवर्णमृगाचा शोध m. २ lit. हंसाची शिकार. Chasable a. शिकार करण्यास योग्य. Chaser n. पाठलाग करणारा. २ जहाजाच्या मागल्या बाजूला ठेवलेली तोफ f. Chase (chās ) [ Short for Enchase which see.] v. t. दागिन्यांवर उठावाचें नकशी काम करणे.२ जडणे, जडावा काम करणे. Chas'er n. enchaser दागिन्यावर उठाव नकशा काढणारा. २ a hard tool of steel नकशी काम करण्याचा कोरणी f. Chasing n. उठावाचें नकसकाम करणे करण्याची रीत f. Chase (chās) [Fr. chasse, a shrine.-L. capsa, a chest.] n. खांचणी f, खोबण f, खांचा m, बंदुकीची पोकळ नळी. Chase (chās) n. जडाव कामाकरितां केलेले कोंदण n. २ a rectangular iron frame to confine types छाप खान्यांत जुळलेले खिळे (टाईप) बांधण्याची लाेंखडी चौकट f, चेस f. Chasm (kazm) [ L. chasma, a yawning gulf. Gr. chainein, to gape, to yawn, vide Chaos. ] n. चीर f, भेग f, चील f, चिळण f, भगाड n, भगदाड n, भगदळ n, तडा m. २ फट f. Chasmed (R.) a. Chasm'y a. भेग पडलेला, चिरांचा, भेगाळ. Chasseur (sha-sar' ) [Fr. a huntsman. ] n.

पारधी m. २ mil. चपळ गतीची पायदळाची अथवा घोडेस्वारांची तुकडी. ३ डोक्यावर तुरा खोचलेला व हातीं तरवार घेतलेला असा उमरावाचा हुजऱ्या. ४ (चपळ रीतीने इकडे तिकडे जातां यावे म्हणून) सुटसुटीत पोशाखाचा शिपाई m. Chaste (chāst ). [ Fr. chaste.-L. castus, pure ] a.(of females) सती, पतिव्रता, साध्वी, अव्यभिचारिणी, पवित्र, अश्राफ, इमानी, colloq. कासोट्याची बळकट खबरदार. These words apply chiefly to married women; for words applicable to the unmarried ones, see Continent, and Virgin & for words for 'chaste' of men, see also Continent. २ not obscene decent, pure, अबिभत्स, सात्विक, पवित्र, निर्मल, निप्कलंक, मर्यादशील, पाक, साधा, साफ; as, [C. EYES पाकनजर f.] ३ language or style निर्दोष, शुद्ध, संस्कृत, दोषरहित; as, C. style in composition. ४ (obs.) अविवाहित (कुमारी). Chastely adv.Chaste'ness, Chas'tity n. साध्वीपणा m, पातिव्रत्य n, सतीत्व n, साध्वीत्व n, अव्यभिचार m. २ बीभत्साभाव m,