पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/650

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रास्थितिपट m. ३ a sheet of paper, paste-board or the like on which information is exhibited, पट m, नकाशा m. ४ (obs.) सनद f, दस्तऐवज m, शासनपत्र n. [HELIOGRAPIHIC C. सूर्य व त्याचे डाग यांचा नकाशा m, सूर्यपट. [HELIOGRAPHIC C. चंद्राची सपाटी दाखविणारा नकाशा m, चंद्रपट. TOPOGRAPHIC C. एखाद्या विवक्षित स्थळाचा बारकाईने काढलेला नकाशा m, स्थलविशेष-पट.] C.v.t. to map out नकाशा काढणे; as, To C.a. coast. Charta'ceous a. कागदासारखा-नकाशा-सारखा दिसणारा. Chartless a. Charter (chärt'er ) [O. Fr. chartre.-L. chartula, dim. of charla, a paper. ] n. a deed of grant राज-संमतिपत्र n, राजसंमति f, सनद f, फरमान f, शासन n, शासनपत्र n. २ a deed of conveyance खतपत्र (?), दस्तऐवज m, लेख m. ३ a special privilege or immunity or exemption खासहक्काची सनद f, विशेषाधिकारपत्रिका f, माफीची सनद f. ४ naut. जहाज भाड्याने देण्या-घेण्याचा करार m. ५ परवाना m. ६ license, liberty राजरोशी f, मुभा f. [ MAGNA CHARTA ( MAG'NA KAR'TA) मॅग्नाचाटी. इ. स १२१५त इंग्लंडचा राजा जॉन याने प्रजेला लिहून दिलेला करार m.] C. v. t. to establish by charter सनद देऊन कायम करणे. २ to let or hire by charter (as a ship ) करारनामा करून भाड्याने देणे-घेणे, गलबत भाड्याने देण्याघेण्याचा मक्ता करणे. Chart'ered p. राजसंमत सनदीने स्थापिलेला, सनदीने हक्क असणारा, सनद मिळालेला. Charter-party (chärt'er-pär'ti) [Fr. chartre partie, a divided charter.] n. a mercantile lease of a vessel गलबताच्या भाड्याविषयींचा करारनाना m, गलबताचें भाडपत्र n. Charwoman, see Chare III. Chary ( chār'i ) [A. S. cearig, careful.] a. careful, axutious सावध, काळजी घेणारा. २ fastidious, shy, particular तोळेबंद जपणारा-वागणारा (दुसऱ्याचा उपमर्द-अपमान होऊ नये म्हणून) अतिविनयशील. ३ ( with in & of ) अमुक एक काम करण्याला नाखुष, होतां होईल तितकें टाळणारा; as, Tradesmen chary of allowing vessels to leave port prior to paynment. ४ frugal, sparing हात राखून खर्च करणारा, मितव्ययी, काटकसरी. Char'ily adv. काटकसरीने, मितव्ययाने. Char'iness n. काटकसरीपणा m.

Charybdis (ka-rib'dis ) (Gr. karybdis, a dangerous whirlpool on the coast of Sioily opposite Scylla (a dangerous rock ) on the Italian coast, see Seylla.] n. सिला बेटानजीक गलबतांचा विध्वंसक असा पाण्याचा भयंकर भोवरा. २. fig. मोठे धोक्याचे कारण n. Chrase (chās ) [O. Fr. chacier, chasser, to pursue-L. captare, freq. of capere, to take. See Catch.] v. t. to pursue for the purpose of taking शिकार करणे. २ to hunt पाठीस लागणे, पाठलाग करणे. ३ to drive away (with from, out of, to, & into)(पाठीस लागून)