पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/646

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संयुक्त करणे-भरणे; as, To C. a wire with electricity. २ (a)(with a duty, task, responsibility) माथी मारणे, गळ्यांत घालणे, ओझें n- भार m- माळ f- गळ्यांत घालणे-स्वाधीन करणे. (b) to commission, to entrust दिग्मतीस-तैनातीस-तसलमातीस-पागेस-दुमाल्यास-विल्हेस लावणे-घालणे-देणे. [ In the last two senses, the business charged is the object of the verb. and the person charged with it is in the Genitive case.] (c) (with a fault or crime) (वर) आरोप करणे, माथीं मारणे, (वर) आणणे, चार्ज ठेवणे. (d) to enjoin, to exhort, to lay a command or injunction upon निक्षून सांगणे, बजावणे, हडसणे, बजावून-हडसून-खडसून सांगणे. (e) (a sum or price) मोल n- किंमत f- हेल f. भाडे n- &c.-मागणें-सांगणे. (f) to deliver official or formal instructions or an exhortation to कायद्याची दिशा-मार्ग दाखविणे, कायदयाचा सारांश समजून सांगणे; as, To C. a jury. (g) मालमत्तेवर कर-भाडे बसवणे. (h) च्या नांवाने नांवावर लिहिणे मांडणें-आकारणे. ३ to attack impetuously हल्ला m- चाल f- चढ m- करणे, चालून जाणे (with वर of o.), तुटून आंगावर जाणे-पडणे. C. v. i. वर हल्ला करणे. २ किंमत-मोल मागणे-सांगणे. ३ to debit (to an account) नांवावर मांडणे; as, To C. for purchases. C.n. भार m, बोजा m. २ (बंदुकीचा) बार m, भर m, पेट m. [O. OF NAILS, STONES, BALLS, &c. छश m.] ३ सुरुंगाचा बार m. ४ the materials, introduced at one time, or at one round into the furnace घाणा m. ५ विधुत्संचय m, विद्युत्संचार m.. ६ घोड्याच्या आंगावर मारण्याचे पलिस्तर n. ७ किंमत f, खर्च m. ८ हवाला m, जिम्मा m, जोखीम n , निसबत f, रखवाली f, राखण f. [RELEASED FROM A CHARGE जिम्मापारख. THAT HOLDS A. C. OR TRUST जिम्मेदार; THAT IS UNDER THE C. OF दिम्मतवार, दिमती; UNDER THE C. OR CARE OF स्वाधीन, हवाली .] ९ command or conduct दिम्मत f, तैनात f, तसलमात f. १० an object committed to the charge अमानत f, अनामत f, ठेव f, दिम्मत f. ११ a business charged, a trust imposed, a commission entrusted काम n, सोपवलेले काम n, अधिकार m. १२ law. आरोप m, तोहोमत f, अभियोग (S.) m, चार्ज m, बोजा m. १३ पंचांस खटल्याचा सारांश समजावून सांगणे. १४ सूचना f, ताकीद f, सांगणी f, आज्ञा f, हुकूम m, बजावणी f. १५ चाल f, चढ f, लढाई f. १६ हल्ला करण्याची इशारत f. Charging v. n. See the meanings of the verb. Chargeable a. आरोपणीय, आकारणीय. Chargeableness n. Chargeably adv. Charge'ful a. ( Shakes.) खर्चाचें. Charge-house n. (Shakes.) विद्यार्थ्यांचे भोजनवसतिगृह n. Chargeless a. फुकट. Charger n. आरोप घेणारा, &c. २ (obs.) थाळा m, तबक n.

३ a war-horse लढाऊ घोडा m, रणधोडा m.