पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/645

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

terise,-(ze) v. t. to define in form or outline लक्षण सांगणे, लक्षणकथन-वर्णन करणे g. of o. २ (चें-ला) विशेषण देणें ; as, Characterised by benevolence. ३ गुणभेद करणे. ४ (obs.) वर छाप मारणे, निशाणी-चिन्ह करणे. Characterised p. लक्षित, लक्षणलक्षित, लक्षणयुक्त, विशेषित, विशिष्ट, चिन्हित. Characterism n. (obs.) स्वभाव m, लक्षण n Characteristic n. लक्षण n, विशेष m, खुबी f, खूण f. २ वैलक्षण्य, लाक्षण्य n. ३ math. पूर्णभाग, पूर्णीक M, (घातगणितांत) पूर्णांक m. Characteristic,-al a. ( with of) लाक्षणिक, असाधारण, विशेषक, योग्य, उचित, विशेषगुणवोधक, गुणदर्शक. Characteristionlly adv. Char'acterless a. Char'acterlessness n. Char'actery n. लिपि f, मुद्रा f, ठसे m. pl., चिन्हें n. pl. &c. २ चिन्हांनी विचार व्यक्त करणे. Out of Character (एखाद्याची) कृति-लिहिणें-धंदा-वय-सामाजिक स्थिति यांना अनुसरून नसणारे, परिस्थितिविरुध्द. Charade (shar-ad') [Fr. charade, a long talk, from Provencal charra, to chatter. ] n. शब्दसमस्या f, उखाणा m, कोडें n. Charcoal (chār'kol) [ह्या जोडशब्दांची व्युत्पत्ति अनिश्चित आहे. इंग्रजी char = जाळणे, आणि Coal ह्या दोन शब्दांपासून Char-coal हा शब्द झाला असावा असें कांहीं शब्दशास्त्रवेत्त्यांचे मत आहे. कोणी इंग्रजी Chāre बदलणे ह्या शब्दाशी याचा संबंध जोडितात. Charcoal, turncoal = wood turned or converted into coal.] n. ज्वाला न होऊ देतां अर्धवट जाळलेल्या लाकडाचा कोळसा m, लांकडी कोळसा (दगडी कोळसा नव्हे). Charcoal-burner लोणारी m, कोळसेकरी m. Red-hot-charcoal जिता कोळसा. Animal-charcoal प्राणिज कोळसा. Mineral-charcoal खनिज कोळसा. N. B.--The name coal itself originally meant charcoal and collier, charcoal-burner. Perhaps, the word 'charcoal' was introduced into the English language to distinguish Coal from Sea-coal & Pitcoal, See the word Coal. Chare (char), see Char (III). Charet (chär'et), same as Chariot.

Charge (chärj) [Fr. charger, to load. L. L. carricare, to load a car, from L. carrus, a car. Charge शब्दाचे मूळ अर्थ (1) भरणे. (२) (वर) खर्च-जबाबदारी-दोष-त्रास-इत्यादिकांचा बोजा घालणे. (३) एकदम हल्ला-चाल करणे, असे आहेत. व खाली दिलेले निरनिराळे अर्थ ह्या तिहींपैकी कोणत्या तरी एका अर्थाला धरून आहेत.] V. t. (a) भरणे, ओझें घालणे, लादणे; as, To C. the memory with facts. (6) बंदुकीत बार भरणे; as. To C. the gun. (c) पुरें-तोंडोतोंड भरणें ; as, To C. the vessel with liquor. (d) एखाद्या पदार्थात दुसरा पदार्थ मिसळणे-घोळवणे एकजीव-विद्रावित करणें ; as, To C. the air with vapour ; To C. the water with mineral substances. (e) वीज इत्यादिकांनी संचारित-