पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/640

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाऊलबुद्धि f, अनित्यता f, चलता f, अस्थायिता f. Change'able a. (v. V. T. 1.) possible to be changed. परिवर्तनयोग्य, फिरावया-परताया-चा-जोगा-जोगता-&c., फेरफार करायाजोगा-&c., विकार्य, अनित्य, अस्थिर, परिवर्तनीय. २ changeful, mutable, variable, inconstant, fickle बदलणारा, चंचल, चंचलचित्त, चंचलवृत्ति, तरल or प्रकृतितरल, लहरी, लहरीदार, लहरीबहरी, अस्थिरमनाचा, अस्थिर, अस्थिरबुद्धि, क्षणिकबुद्धि, क्षणिकचित्त, क्षणिकवृत्ति, तिरतिरा or च्या, क्षणोक्षणी बदलणारा. Changeably adv. Changed p. (v. V. I.) बदललेला, फिरलेला, फेर पडलेला-झालेला, &c. Change'ful a. see Changeable. Change'fully adv. Change'fulness n. Change-house n. (R) लहान खाणावळ f, एलदारू विकण्याचे दुकान n. (R) Change'less a. नित्य, स्थायी, शाश्वत, स्थिर, अचल. Changeling n. a changed child बदललेले मूल n. २ कुरुप-नठमूल n, मूर्ख. ३ (R) चंचल मनाचा मनुष्य m. C. a. बदली दिलेले-घेतलेलें. Changer n. फेरफार करणारा m- बदलणारा. २ सराफ. Changingpiece (R.) चंचल मनुप्य m. To change colour लाजेने काळवंडणे, (चें) तोंड-नूर उतरणे. To change hands धनी-मालक बदलणे. To change one's mind आपला विचार किंवा मन बदलणे. To change one's self कपडे बदलणे. To change one's tune बोलण्याची पद्धत बदलणे, सूर बदलणे, (collog.) हसायचे टाकून रडू लागणे . Change-wheel बदलतां येणारे चाक. To put the change on गोता देणे, फसविणे. To ring the changes on तीच गोष्ट पुन्हा पुन्हां निरनिराळ्या त-हेने सांगणे. Change of direction दिशांतर. Change of life स्त्रीचा रजस्वला किंवा गर्भधारणा होण्याचा काळ जाणे (हा काळ ४५ पासून ५० वर्षेपर्यंतचा आहे). Change of pitch सुराचा बदल, स्वरभेद. Change of property गुणधर्मविषर्यय. Change of state स्थित्यंतर. Channel (chan'el) [O. Fr. chanel.-L. canalis, a water-pipe.] n. (of a river, &c.) पात्र N, तास n. २ (for water, for irrigation, &c.) पाट m, सारणी f, कुल्या f, pop. कालवा m, पन्हळ m, पन्हळी f, थर m, नाला m. [ Ever running C. ओला दंड m. Raised C. or course दांड (डा) m.] 3 arch. (to carry off water) a gutter मोरी f, नहर m, प्रणालिका f, प्रणाली f, सारणी f, सारण n. ४ (as, of a pillar, &c.) खांचणी f, बलकी f. ५ a strait सामद्रधुनी f, खाडी f. ६ a medium of passing, conveying or transmitting द्वार pop. दार n, मार्ग m, वाट f; as The news was conveyed to us by different channels. C. v. t. कालवा काढणे, खांचणी-पन्हळ पाडणे. Chann'elled p. a. The Channel इंग्लिश खाडी f. Channel-bill zool. ऑस्टेलियांतील कुकु नांवाचा पक्षी m.

Chant (chant) [Fr. chanter --L. cantare, canere, SK. कण, to sing.] v. t. गाणे, गाण्याच्या ढबीवर म्हणणे; as, "When she chants her evening hymn," आलापणे, तालाशिवाय गाणे. [To CHANT THE PRAISES OF प्रशंसा