पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/637

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to fall.] n. ( as the cause of events ) देव n, देवगति f. [BY C. दैवाने, दैवयोगानें, दैववशे, दैववशात्, प्रारब्धगत्या, यदृच्छेकरून.] २ fortune, fate, turnup, luck: दैवदशा f, दैवरेषा f, कपाळरेखा f, दैवयोग m, दैवघटित n, प्राक्तनयोग m, अदृष्टयोग m, दैव n, नशीब n, प्रारब्ध n. ३ आकस्मिक-दैवाने घडलेली गोष्ट f, दैवकृत्य n, दैवघटित n, यदृच्छा f. ४ a possibility of occurrence संभव m, होण्याचा-घडण्याचा- &c.-संभव M, घटनायोग m, घटनशक्यता f, भवितव्यता f, लाग m, अवसर m; as, A C. to escape: The chances are all against him. ५ संधि f; as, To lose a C. C. v. t. (with it) धाडस करणे. २ नशिबावर हवालणे-सोपविणें-हवाला ठेवणे. C.v.i. दैवगत्या-आकस्मिकरीतीने-आगंतुकरीतीनं होणे-घडणे-घडून येणे. C. a. casual दैवागत, दैवघटित, आगंतुक, विधिप्राप्त, आकस्मिक. C. adv. दैवयोगाने. Chance-comer n. अवचित येणारा. Chanc'eful a. अनिश्चितपणाचा, नशिबाचा. Chance'iness n. (R.) अनिश्चितपणा m. Chanc'y a. (obs.) भाग्याचा, नशीबवान. २ colloq. अनिश्चित; as, " The crop is a chancy one." Theory of Chance math. संभवप्रकरण n. The main chance खरा लाग, मुख्य हेतु, सुखाची किंवा स्वार्थाची मुख्य संधि f. To stand a. chance of (ला) चा संभव असणे. To take one's chance अमुकेक गोष्टीसंबंधाने फांसा टाकून पाहणे, प्रयत्न करून पाहणे. To mind one's chance संधीकरितां टपून बसणे, संधीची वाट पाहत बसणे. Chancel (chan'sel ) [O. Fr. chancel. -L. cancelli, lattices.] n. that part in a church where the altar is placed चान्सल, चर्चमधील कठडा व वेदी यांमधील जागा f. C. aisle arch. चर्चमधील यज्ञवेदीच्या (प्रार्थनापीठाच्या) आसपासचा सभामंडप m.

Chancellor ( chan'sel-or ) [O. E. chanceler, channceler.-Fr. chancelier.-L. L. cancellarius, a director of chancery, from L. cancelli, lattices which surrounded the seat of judgment. In the Roman empire the 'Cancellarius' was a petty officer stationed at the bar of a law-court as an usher; next he had risen to be a Secretary or Notary. In latter times he was invested with judicial functions under the Norman kings in England. The Chancellor was the official secretary having superintendence of all charters, letters, and official writings of the sovereign, the custody of the royal seals, and important legal functions.] n. (obs.) राजाचा किंवा मोठ्या सरदाराचा किंवा परकी राजाच्या वकिलाचा चिटनीस m. २ इंग्लंडांतील राजाचा चान्सेलर पदवी धारण करणारा एक मुख्य मंत्री m (प्राइम मिनिस्टर नव्हे), पंडितराव m, अतिशय भानगडीच्या खटल्याट ह्याने दिलेला न्याय सर्व लोकांना मान्य होतो. ह्यालाच Lord Chancellor आणि Lord High Chancellor असे म्हणतात. [Chancellor of the Exchequer