पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/633

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

v. t. to vex, to mortify खट्टू करणे, खजील करणे, हिरमोड करणे. C.v.i. खट्टू होणे. Chagrin', Chagrined' a. खट्टू केलेला. Chain ( chān) [Fr. chaine, from L. catena.] n. सांखळ m. dim. सांखळी f, शंखला f. [FINE CHAIN (AS OF A WATCH ) जंजिरी f, जंजीर f. LARGE IRON CHAIN लंगर m. LARGE & THICK C. सांखळदंड m. LITTLE C., C. OF TWO OR THREE LINKS कडी f.] २ lit. & fig. fetters, bond, shackles बंद m, बंधन n, बंध m, बिडी f, शृंखलाबंधन n; as, The chains of habit. (TO RIVET. ONE'S CHAINS lit. & fig. आपली बिडी जास्त घट्ट करून घेणे.] ३ a series, a concatenation सांखळी f, शृंखला f, माला f, ओळ f, रांग f, सिलसिल्ला m, श्रेणी f, अन्वय m, आनुपर्वी f, परंपरा.f; as, A chain of mountains, A chain of events. C. v. t. to fasten or bind securely as with a chain. सांखळीने जोडणे, सांखळीने बंद करणे, शृंखलाबद्ध करणे, सांखळीने बांधणे; as, To C. a bulldog. २ to enslave गुलाम करणे. ३ to unite closely & strongly घट्ट आणि मजबूत रीतीने जोडून टाकणे; as, "And in this vow do chain my soul to thine." C. armour कड्यांचें चिलखत n, कड्या गुंतवून केलेले चिलखत. Chained a. सांखळीने बांधलेला-बद्ध केलेला. Chain-gang n. सांखळीने बांधलेल्या कैद्यांची टोळी f. Chain'less c. मोकळा, सुटा, अबद्ध; as, C. mind. Chain-bridge n. सांखळदंडाचा-सांखळपूल, सांखळदंडी पूल. C.-let n. लहान सांखळी f. C.-pier सांखळदंडाने केलेला त्रिकोणी धक्का m. C.-rule n. (arith.) सांखळरीत f. C.-shot n. जंजिरीगोळी f, जोडगोळी f. C.work जाळीचे-नकशीचे काम n. Chain'ing n. सांखळीने बांधणे n, शृंखलाबंध m, शृंखलाबंधन n, बिडी f घालणे. Chair (chār) [Fr. chaire, a pulpit.-L. cathedra.-- Gr. kathedra, a seat, from kata, down & edra, a seat.] n. खुर्ची, खुरची f. [Easy-C. or seat सुखासन n, आरामखुर्ची f.] २ the seat of authority गादी f, अग्रासन n, मुख्यासन n, अध्यक्षाचं आसन n, अध्यक्षासन n. ३ (as of a professor) गुरुपीठ n , गुरूची जागा f, अध्यापकपीठ n. ४ (sedan C.) नालकी f, एखाद्याला इकडून तिकडे नेण्याची खुर्ची. C. days बसण्याचे दिवस m.pl, वृद्धापकाळ m. C.-bed बिछान्यासारख्या उपयोगाची खुर्ची, हिच्यावर निजतां व बसतां येते, बिछानाखुर्ची. Chair'man n. the president of an assembly सभानायक (R.) m, सभापति (R.) m, सभाध्यक्ष m. Chairman-ship अध्यक्षाचा हुद्दा-मान m, अध्यक्षगिरी f, अध्यक्षपणा m, अध्यक्षत्व n. To put into the chair अध्यक्ष नेमणे. To take the chair सभेचा अध्यक्ष होणे. अध्यक्षस्थान स्वीकारणे. To address the chair अध्यक्षाला उद्देशून बोलणे.

Chaise (shāz) [Fr. chaise, a seat or chair, a carriage.] n. दोन माणसे बसण्यापुरती एक लहानशी उघडी दुचाकी एका घोड्याची गाडी, शेज f.