पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/602

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cas'tellan n. किल्लेदार M, गडकरी. Cas'tellated a. किल्ल्याप्रमाणे मनोरे किंवा तटबंदी असलेला. Castlebuilder n. fig.day-dreamer मनोराज्य करणारा. Castlebuilding n. fig. मनोराज्य करणे n. Castled a. Castleguard,-ward n. किल्ल्याचा रक्षक, किल्लयावरचा पाहारेकरी. २ (Old English Law ) किल्ल्याच्या नियमित अंतरामधील घरावरील कर-घरपट्टी f, हा कर घराच्या रक्षणार्थ द्यावा लागतो. Castlery n. किल्ल्यावरील सत्ता f. Castlet m. लहान किल्ला m. Castles in Spain, Castles in the air मानससृष्टि f, मनोराज्य. N. B. Castle = किल्ला, Fort = गड, Fortification = तट, Fortress = लहान गड. Castellated, see Castle. Castling (kāstling) n. गर्भपात m, गर्भस्राव m. Castor ( kas'tor ) [L. castor, the beaver; obtained from the special glands of the beaver. Of Eastern origin-Sk. kasturi, musk.] n. एक जातीचा जलस्थलचर (क्यास्टर नांवाचा) चतुष्पाद प्राणी m. २ बीव्हर जनावराच्या लोकरीची टोपी f. हिला क्यास्टर म्हणतात. ३ कोट करावयाची एक फार किंमतीची बनात f, क्यास्टर नांवाची बनात f. Castor (kastor ) [L.] n. astron. मिथुन राशीमधील पुनर्वसुनक्षत्राची पहिली तारा M, अश्विनीकुमारपुंजांतील एक तारा m. Castor and Pollux अश्विनीकुमार. CASTOR AND POLLUX WERE THE TWIN SONS OF JUPITER AND LEDA.] Castor-oil (kas'tor-oil) [A corruption of castus oil, fornnerly called aynus castus.] n. (the oil) एरंडेल n. C.-plant. Ricinus communis or Palma Christi एरंड m.-seed एरंडी f, एरंडबीज n. (the root) एरंडमूळ n. [SOME VARIETIES OR SPECIES ARE:--एरंडी, सुरती एरंड m, गोडा एरंड m, चंद्रज्योत f, कडवा एरंड m, श्वेतएरंड m.] Castor-bean n. एरंडी f. Castors same as Casters under Cast. Castral (kas'tral) [L. castora, camp.] a. लष्कराच्या तळासंबंधी. Castrametation (kastra-me-tā'shun) [L. castra, camp, & metior, Sk. मा , to measure off.] n. mil. तळ देण्याची कला f, तळ देणे n, छावणी देणे n.

Castrate ( kas'trāt) ] L. castrare, castratus, to geld; akin to Sk. शस्र , knife.] v. t. to emasculate खच्ची करणे, खोजा करणे, अंड m. pl. काढणे g. of o., अंडच्छेद m- अंडच्छेदन n. करणे g. of o., नामर्द करणे. २ (by pounding the testicles ) बडविणे, चेचणे. ३ to expurgate ग्रंथ-लेख वगैरेंतून बीभत्स किंवा जालिम भाग काढून टाकणे. Cas'trated p. (v. V.) खच्ची केलेला, बडविलेला, भादा (द्या), खोजा, &c. Castra'tion n. (v. V. 1.)-act. अंड काढणे n, खच्ची f, अंडच्छेद m, अंडच्छेदन n. २ अंड बडविणें n, चेचणे n, बडविणे n. Castrato n. उंच आवाज रहावा म्हणून लहानपणा