पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/590

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Carpeted pa. P. Carpet-bag n. प्रवासांत उपयोगी पडणारी पिशवी f, प्रवाशी थैली f, प्रवाश्याचे सामानाचा कोथळा m, पडशी f. Carpet-bagger n. कार्पेटब्यागर नांवाचे लोक. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांपैकी उत्तरेचे व दक्षिणेचे लोक. यांच्यामध्ये १८६५ मध्ये आपआपसांत लढाई झाल्यावर उत्तरेकडील इसम दक्षिणेकडे येऊन राजकीय हक्क स्वार्थपरायणतेने मिळविण्याची खटपट करूं लागले. त्यांपैकी प्रत्येकास तिरस्काराने हा शब्द लावतात. २ U. S. स्वार्थबुद्धीने साहस करणारा. Carpet-beating n. सतरंजी झोडपणे (धुरळा नाहींसा नियमित करण्याकरितां). Carpet-bedding n. (चित्रविचित्र पण नियमित आकृतीचे) सतरंजीसारखे ताटवे. Carpeting n. सतरंजीने आच्छादणे-झांकणे n. २ सतरंजीचा कपडा m. ३ सतरंजी f, सतरंज्या f. pl. Carpet-monger n. सतरंज्यांचा व्यापारी m. २ (Shakes.) विषयी, बायकांत लुडबुडणारा, बायकांशी जास्त लगट ठेवणारा. Carpetrod n. बैठकपट्टी, (सरकू नये म्हणून) सतरंजीवर बसविण्याची काठी f-पट्टी f. To be on the carpet विषयाची चर्चा होत असणे, प्रस्तुत-चालू असणे. Carpet-knight n. originally a knight of the carpet, "a contemptuous term for a knight whose achievments belong to the 'carpet' (i. e. the ladies' boudoir or carpeted chamber, drawing-room or court) instead of, to the field of the .battle." गेहेशूर (opposed to रणशूर), शेंदाड शिपाई, रणांत लढून 'नाइट' पदवी न मिळवितां राजाच्या दरबारांतच राहून 'नाईट' पदवी जो सिळवितो तो. N. B.-Carpet-bag (पडशी) ही सतरंजीसारख्या जाड कपंड्याची केलेली असते. Carpet ह्याला "सुताडें.” हाही प्रतिशब्द व्यवहारांत वापरतात. Carpolite ( kär'po-līt) [Gr. karpos, a fruit and lithos, it stone.] n. a fossil or petrificd fruit अश्मीभूत फळ m. [पृथ्वीच्या पोटांत कोणत्याही कारणाने बनलेला फळाचा दगड m. अशा त-हेने बनलेल्या दगडांत मूळ फळाचा आकार व केव्हां केव्हां तर रंग देखील कायम राहतो.] Also Curpolithe. Carpology (kärpo'-lo-ji) (Gr. karpos, a fruit & logos, a discourse.] n. bot. फलप्रकरण n, फलवर्गीकरण n, फलविचार m, फळ आणि त्याच्या बिया यांचा विचार करणारा वनस्पतीशाशास्त्राचा भाग m. Carpolo'gical a. Carpolo'gically adv. Carpo'logist n. Carpophore (kär'-pā-för) [Gr. karpos, a fruit & pherein, Sk. भृ, to bear.] n. बीजवाही देंठ m, फलवाही देंठ m, तुन्नगर्भकोशनाल, तुन्नफलवृंत. Carpus ( kär’-pus ) [Gr. karpos, the wrist. ] n. anat. मणिबंध m, मणिबंधास्थिसंघ. हा संघ चार चार हाडांच्या दोन रांगा मिळून झालेला असतो.] pl. Carpi.

Carriage ( kar'ij) [O. Fr. cariage, luggage, carriage, cart, baggage, from O. Fr. carier', charier, to carry.] n. (obs.) भार m, ओझें n. २ (v. V. 1.)-act. वाहणे n, वाहन n. ३ the price of carrying वाहणावळ f, हेल f, हमाली f, नेणावल f,आणणावळ.f, भाडे