पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/589

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मांस खाणारा, मांसभक्षक, मांसाहारी, कव्याद. Carnivorously adv. Carnivor'ousness n. मांसभक्षकपणा m. Carol (kar'ol) [Fr. carole, a (singing ) dance. ] n. आनंदाचे गीत n, हपीनंदगीत n, आल्हादसूचक गीत n. २ भक्तिगीत n, भजन n, कीर्तन n. C. v. t. काव्यरूपाने स्तुति करणे, आनंदाने गीत गाणे. C. v. i. आनंदाने गाणं n. कंपस्वराने गाणे. Carolling n. आनंदाने गीत गाणे n, भक्तिपुरःसर गाणे n. Carol, Carrol (kar'ul ) [O. Fr. carrole, a sort of circular space, or carol. ] n. अभ्यास करण्याची किंवा बसण्याची खिडकीलगतची खोली f. २ खिडकी f, बारी f. Carotid, (ka-rotid ) a. med. ग्रैवेयक, मानेच्या दोन मोठ्या धमनीविषयीं; as, C. artery. Carouse ( kar-owz' ) m. पानसमारंभ m, पानोत्सव m. C.v.i. दारू झोंकणे, खूब दारू पिणे. २ पानोत्सव करणे. Curousal n. पानसमारंभ m. Carou'ser n. पानोत्सव करणारा. Carou'singly adv. Carp ( kārp) [ L. carpere, to seize, to pluck, to deride. ] v. i. दोप काढणे, आढेवेढे घेणे, आडफांटा-आडफांटे-फांटे फोडणे-काढणे, कांक्षा घेणे-काढणे, छिद्रे काढणे, तकरार करणे, कारणावांचून दोष देणे, नांवें ठेवणें ( with at). C. V. t. (obs.) सांगणं. २ दोष देणे. निंदा करणे. Carper n. ( Shakes.) तकरारी m, दोष काढणारा, निंदक. Carping n. आडफांटा m, आढेवेढे pl. २ हेंगल f, पंचाईत.f. Carpingly adv. Carp (kārp) n. नदी, तळे वगैरेंच्या गोडे पाण्यांत सांपडणारा वनस्पत्याहारी मासा m, रोहीमासा m. (हा फक्त पूर्वी आशियांत होता. परंतु आतां युरोप व अमेरिका यांमध्ये नेऊन त्याची वाढ झालेली आहे.) Carpal (kar'pal ) a. मणगटाचा, मणगटाविषयींचा, माणिबंधीय : as, C. bone. C. N. one of the bones or cartilages of the carpus मणिबंधास्थि . Carpel ( kār pel ) [ Gr. karpos, fruit.] n. bot. फलदपर्ण n, बीजकोशांतील फलोत्पादक पान n. २ बीजगर्भसंवेशकपल्लव. Car'pellary a. Carpenter ( kär'pen-tèr ) (L. carpentum, a wagon.] n. सुतार m, बढई, तक्षा, तक्षक, सूत्रधार (R.), सूत्रधारी (R.), सूत्रधर [ R.], (in contempt) तासकाम्या, खरडघाशा, खरड्या, रथकार m. [ BUSINESS OF A C. सुतारकाम, सुतारकी f. WORK EXECUTED BY A C. सुतारकास n.] Carpenter v. i. सुतारकाम करणे. Carpenter-been. लांकूड कुरतडून त्यांत आपले घरटें करणारी मधमाशी f. Carpentry n. सुतारकी f, सुतारकाम n, सुताराचें कौशल्य n.

Carpet (kar'pet) [L. carpere, to pluck.] n. सतरंजी f, बिछायत f, बैठक f, आस्तरण n. [ SOME OF THE INDIAN CARPETS ARE:-गालिचा m, गाशा (?)m, गेटम n, जमखाना m, जाजम n, बाजू f, रुजामा m, सतरंजी ही निरनिराळ्या प्रकारच्या बैठकींची नावे आहेत.] २ बैठकींसारखें आस्तरण n. Carpet v.t. बिछायत f, आस्तरण n. घालणे पसरणे. Carpeting_m.