पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/585

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



फिकीर f. करणे g. of o., चिंता f- घोर m.-&c. लागण g. of o. in-con. २ to be inclined, disposed or desirous चाहणे, चहा f- आवड f- चाड f. लागणे-असणे in con., गरज f. बाळगणे g. of o. ३ to mind, to heed जुमानणे, गुमानणे, जुमास m- जुमान m- गुमान m. बाळगणे-खाणे (generally with for or about before the object ). Care-crazed a. काळज्यांनी वेढावलेला, चिंतामग्न, चिंताविक्षिप्त, चिंतामूढ. Careful a. काळजीचा, चिंतायुक्त, जागृत, उद्वेगी(?), आस्थेकरी, आस्थेवाईक, आस्थिक. २. heedful, cautions सावध, हुशार, सावधान. Care'fully adv. काळजीनें, चिंतापूर्वक. २ सावधगिरीनें, सावधपणानें. ३ जपून, संभाळून. Carefulness n. (v. A.) सावधानता f, काळजी f, चिंता f, सचिंतता (R) f. २ सावधगिरी, सावधपणा m, सावधानता f , खबरदारी f. Care'less a. unsolicitous, unanxious, unconcerned. निःश्चित pop. निचिंत, निकाळजी, निष्काळजी, बेपरवा,. बेफिकीर, निर्धास्त, अनास्थ, आस्थाहीन-रहित, अजुरदा, निरपेक्ष, अनुत्सुक, अनिचाड, निघोरी, निसूर. २ neglectful, unmindful, inattentive, &c. असावध, असावधान, अनवधान, गैरसावध, गफलती or त्या, गाफल or गाफील, गाफली, बेफाम, गबाळी or ळ्या, गलत्या, निष्काळजी, गैदी, गैबी, गैवती or त्या, विसराळू, गैरात, गयाळ, बेपरवा. ३ arising from want of care निष्काळजीपणाचा, दुर्लक्षाचा, आळसाने झालेला, अविचाराचा, अविचारी, बेफामीचा, प्रमादाचा. Carelessly adv. (v. A. 2.) गफलतीने, गाफीलपणाने, हयगयकरून, अनवधानपूर्वक, प्रमादपूर्वक. Carelessness n. (v. A. 1.) निकाळजी f. अलक्ष्य n , दुर्लक्ष्य n, हयगय f, निचिंतपणा n, बेदरदीपणा(?)m, बेफिकिरी f, बेपरवाई f, अनास्था f, आस्थाराहित्य n, हयगय f, निघोरपणा m, निसूरपणा m, चिंताराहित्य n , निरपेक्षता ( Rare in this sense), अनुत्साहता m, निश्चिंतता f. २ गाफीलपणा m, हयगई or हयगय f, गफलत f, आनाकानी f, प्रमाद m, अनवधान n, असावधता f, गैरसावधगिरी f, विसराळूपणा m, गैदीपणा m, गवाळेपणा m. Care-taker रखवालदार , ज्याच्या ताब्यांत कांहीं वस्तु दिली आहे असा मनुष्य m. २ आयर्लंडमध्ये ज्या जमिनीचा ताबा, सरकार मालकाकडून एखाद्याच्या ताब्यांत देतें तो इसम, ताबा घेणारा. Cure-worn चिंताग्रस्त, चिंतातुर. Take care ! खबरदारी घे, जप, सांभाळ. To take care of जतन करणे, सांभाळणे, संगोपन करणे, (ची) काळजी घेणे, (च्या) वर लक्ष ठेवणे. To commit to the C. of (च्या) हवाली देणे-करणे.

Careen (ka-rēn') (L. carina, a keel.] v. t. naut. (तळाच्या दुरुस्तीसाठी) जहाज कलतें करणें, कानवडा करणे, कुशीस करणे-पाडणे. C. v.i . जहाज कलतें होणे. C. n. जहाजाचा एका बाजूस होण्याचा कल m. Careen'age n. (जहाजांचा) दुरुस्तीखाना m. ज्या ठिकाणी जहाजें दुरुस्ती करण्याकरितां कलती (एका बाजूवर) ठेवतात तें स्थान n. नौकापरिवर्तनस्थान n. २ जहाजाच्या तळाच्या दुरुस्तीचा खर्च m.