पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/584

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

kardamommon. ] n. bot. वेलची f, वेलदोडा m. २ वेलचीचे झाड n. Cardiac ( kär'di-ak) [L. cardiacus.-Gr. kardia, the heart.] a. काळजासंबंधी, हृदयासंबंधी, काळजाजवळचा. २ med. a stimulant for the heart हृदयांत विशेष चलनवलन उत्पन्न करणारें (औषध), दीपक, हृदुत्तेजक. C. n. a cardial हचलनोत्तेजक औषध n. Car'dialgy, Cardialgia n. a heart-burn छातींत-उरांत जळजळणे-वेदना f. Car'diograph, Car'diogram [Gr. graphein, to write.] n. हृच्चलनलेखक. हृदयाच्या चलनवलनाचा वक्र ज्याने घेता येतो असें यंत्र n. Cardioid n. a geometrical curve, so called from its heart-like form हृदयवक, हृदयच्छेद, हृदक्र. Carditis n. हृदयांतील दाह m, छातींतील-उरांतील दाह m, उरोदाह. Cardinal ( kär'din-al) (L. cardinis, cardinalis, from cardo, hinge of a door, that on which a thing turns depends.] a. मुख्य, श्रेष्ठ, मूल, प्रधान. C. n. कार्डीनल m, रोमन क्याथोलिक पंथाचा मुख्य धर्मगुरु (पोप) निवडण्याचा ज्या सत्तर इसमांना अधिकार आहे त्यापकी एक, पोपच्या खालोखालच्या दर्जाचा धर्माधिकारी. २ बायकानी घालावयाचा) कार्डिनल नांवाचा लहान झगा m. ३ (मसाला घालून कढविलेली) कार्डिनल नावाची लाल दारू f. Car'dinalate, Car'dinalship n. कार्डिनलपणा m. २ कार्डिनलचा अधिकार m,- पदवी f. २ कार्डिनलचा प्रांत-प्रदेश-इलाखा m. Cardinal-bird n. कार्डिनल पक्षी m. अमेरिकेतील एका गाणाऱ्या पक्ष्याचे नाव n. (त्याचा पिसारा तांबडा असतो.) Cardinally adv. Shakes. मुळास धरून. Cardinal flower एक रच कार्डिनल नांवाचें सबक फूल n. (याचे मूळ औषधाच्या उपयोगी पडतें.) Cardinal numbers मूलांक; .' एक, दोन, तीन, [पहिला, दुसरा व तिसरा इत्यादि अंकाना Ordinal numbers क्रमांक म्हणतात.] Cardinal point geog. (पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा) मुख्य दिशा. Cardinal signs astron. मेष, कर्क, तुळा आणि मकर अशा चार मुख्य राशी. Cardinal virtues (prudence, Justice, temperance, and fortitude) दूरदर्शित्व, न्यायप्रियता, नेमस्तपणा आणि सहनशीलता हे चार प्रमुख मुख्य गुण, सद्गुण; हे जुन्या ग्रीक लोकांत मुख्य सद्गुण समजले जात असत. Cardinal virtues मुख्य चार दिशांकडून वाहणारे वारे. N. B.-We shall give under the word 'Leading distinctions between Chief, Main, Principal, Leading, Cardinal, and Capital. Care (kār) [A. S. caru, ceara, akin to O. S. kara, sorrow. Goth. kara, perh. from Gr. karos, voice.] n. काळजी f, चिंता f, आधि f, मानसिक व्यथा f, घोर m, आंच f, कळकळ f. २ जपणूक f, निगा f, जतन n, देखरेख f. as Left to his care. ३ सावधगिरी f, खबरदारी f,

४ विशेष काळजी बाळगण्याची वस्तु f- विषय C. v. i, to have solicitude, anxiety or concern चिंता f. वाहणें करणें-धरणें g. of o.,