पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/582

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Carboy ( kar boi) [Pers. garabah.] n. 'कारावा,' रक्षक सांगाडा असलेली निळी किंवा हिरवी बाटली (हिचा उपयोग गंधकाम्ल (Sulphuric acid ) वगैरे भरण्याकडे करितात), सांगाड्याची बाटली. Carbuncle (kär'bung-kl) (L. carbunculus, dim. of car.bo, coal.] n. लाल m, माणिक्य (pop.) माणीक m. dim. माणकी f. २ rel pimple अतिशय टप्पातेने झालेला मोठा फोड m, पुष्कळ तोडे असलेले गळू n- पुळी f. ३ (on the back ) काळपुळी f, काळफोड m, देटपुळी f. ४ अग्निरोहिणी. Carbuncled a. काळपुळी झालेला. २ माण लावलेला. Carbun'cular, Carbunculate a. लाल माणकाचा. २ काळपुळीचा. Car bunculation n. bot. the blasting of the young buds of trees or plants by extreme heat or cold अतिशय थंडीने किंवा उष्णतेने वनस्पतींच्या किंवा झाडांच्या कळ्या मरणे-खुरटणे. Carburet, same as Carbide (in the word Carbon ). Carbureted a. कारबाननें बनलेला. Carcanet ( kärka-net ) n. (Shakes.) रत्नमाला f, जडावाचा हार m. Also Carkanet, Carcant. Carcass, Carcase ( kar'kas) n. a dead body मढ़ें-डे.n, मुडदा m, मुरदा m, शव n , प्रेत n, लोथ (ध) f, (of a beast) पडें n. २ (जिवंत मनुष्यास तिरस्काराने) कुडी f, कूड f , कलेवर n , लोधा m, लोथ f.३ सांगाडा m, खटारा m, सांगटा m, सांटा m. ४ बोटीचा वगैरे कुजलेला सांगाडा; as, A rotten C. of a boat. ५ कोणत्याही अपुऱ्या वस्तूचा सांगाडा m. ६ a hollow cage or shell filled with combustibles (घरांना किवा जहाजाना आग लावण्याकरितां फेंकण्याचा) पेट घेणाऱ्या वस्तूंनी भरलेला गोळा m, एकदम आग लावता येईल अशा पदाथांनी भरलेले भांडे n. हे फेंकल्याबरोबर फुटून आग लागते; as, A discharge of C.es and bombshells.

Card (kārd) [Corruption of Fr. carte, a card.-It. carta.-L. charta.-Gr. kartes, a leaf of papyrus.] n. जाड्या कागदाचा एक लहानसा तुकडा m, चकती f, कार्ड n. २ a playing card गंजिफांतलें पान n, गंजिफ f, पान n, पत्ता m, क्याट m. [ BACK OF A C. पुस्त f. FACE OF A C. रू n. PACK OF CARDS गंजिफा, पत्यांचा गंजिफांचा जोड m, पत्ते, क्याटांचा जोड. THERE ARE THREE PACKS OF CARDS चंगकांचन गंजिफा, दशावतारी गंजिफा, AND बाराराशी गंजिफा. THE FIRST HAS 8 SUITS, THE SECOND HAS 10 SUITS, AND THE THIRD HAS 12 SUITS. SUIT AT CARDS रंग m, रुपें n, बाजू OR बाजी f. THE SUITS OF THE FIRST PACK ARE चंग, कांचन, बरात, खुमाश (स), ताज, गुलाम, रूप, समशेर. THE SUITS OF THE SECOND CORRESPOND TO THE TEN INCARNATION OF VISHNU; AND THE SUITS OF THE THIRD, TO THE TWELVE SIGNS OF THE ZODIAC. गंजिफा किंवा पत्ते खेळतांना पुढील शब्द वापरण्यात येतात. काट, काटणी, काटणीवाटणी, काडी, केतेपान, घेणी, चंगचिल्ली or चंगचिलत, चंगाराणी, देणी, चढतीबाजू, चौवा, चाळणी, चोर,