पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/581

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इत्यादि जवाहीर तोलण्याचे वजन n. [एक क्यारट हा एक रती व एक आणा यांबरोबर आहे. क्यारट हा पूर्वी तीन पूर्णांक एक तृतीयांश ग्रेनबरोबर असे पण आतां तो तीन पूर्णांक एक पंचमांश ग्रेनबरोबर धरतात.] २ सोन्याच्या शुद्धतेच्या प्रमाणाचें क्यारट नांवाचे माप n. [आपल्याकडील शंभर नंबरी सोने चोविस क्यारटबरोबर समजले जाते. एखाद्या सोन्यांत जर बावीस भाग शुद्ध सोने व दोन भाग इतर हीण धातु असेल तर ते सोनें बावीस क्यारटचे आहे असे म्हणतात.] Caravan (kar'a-van) (Pers. karwan.-Ar. quirawan.] n. काफला m, पथिकसमुदाय m, सार्थ m, पथिकसमूह m. [C. OF HORSE-DEALERS कारवान m.] २ लमाणांचा तांडा m. ३ हिंस्रपशु ठेवण्याची गाडी f- पिंजरा m. ४ हिंस्रपशुंचें फिरतें प्रदर्शन n. ५ प्रदर्शनांतील गांवोगांवीं नेण्याची मोठी गाडी f.माल व उतारू नेण्याची मोठी गाडी f. कधी कधी caravan बद्दल नुसतें car म्हणतात. Carava-neer n. सार्थनायक. Caravan'sary, Caravan'sera n. सराई f, धर्मशाळा f, पथिकशाला f. Caravel, Carvel (kar'a-vel,kar'vel) [F.-It. caravelia, a kind of ship.] n. a small fishing-vessel लहान मच्छमारी नौका, मासे मारण्याची होडी f. २ a Turkish man of war तुर्की लढाऊ गलबत. Caraway (kar'a-wā) or Carum [Gr. karon.] n. ओवा, जिरें ह्यांच्या जातीचे धान्य n. [ CARUM COPTICUM ओंवा, अजवान, अजमोदा. CARUN CARUI जिरें. CARUN NIGRUM शहाजिरें.] Carbazotic (kar-bar-zotik) [carbon and Azote.] Carbine ( kar'-bin) n. 'कारबीन,' घोडेस्वाराकरितां लहान बंदुक f. See Carabine.

Carbolic-acid (kar-bol'ik-as'id ) n. chem. कोलटार (coal-tar) पासून काढलेलें पूतिनाशक तेल n, कार्बालिक तेल N. See Coal-tar. Carbon (kär'bon) (L. carbo, carbonis, coal.] n. chem. शुद्ध कोळसा m, अंगार(?)m, कार्बान, कर्ब. हे एक रासायनिक मूलतत्व आहे. याचा अणुभारांक ११.९७. Carbide n. chem. a binary compound of carbon with some other element or radical, in which the carbon plays the part of a negative कर्ब व एखादी धातू ह्यांचा संयुक्त पदार्थ m, कर्बाइत. Formerly called Carburet. Carbonā'ceous, Carbon'ic a. कारबाणसंबंधी, कारबान वायु असलेला, कर्बवायूसंबंधी. Carbonate n. कारबानमय लवण, कार्बानिक अम्ल आणि एखादें भस्म (base) यांपासून झालेलें लवण. Carbonated a. Carboniferous a. शुद्ध कोळसा उत्पन्न करणारे. Carbonisation n. कार्बान-शुद्ध कोळसा बनविणे. Car'bonise v. t. कारबानाच्या-शुद्ध कोळशाच्या रूपांत आणणे. Carbonic acid प्राणवायु (oxygen ) आणि कर्ब (carbon) यांपासून झालेला एक वायुरूप पदार्थ m, कर्बिकाम्ल. Carbonate of lime खडू, भाजलेला चुनखडा, चुन्याची कळी. Sodium carbonate पापडखार. Carbon-process photo. See Photography.