पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/576

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खांबाचा मथाळा m, स्तंभशीर्ष m. २ the chief city राजधानी f, राजनगर n, मुख्य नगर n, तख्ताची जागा f. ३ The trade's stock: मुद्दल n, पुंजी f, भांडवल n, मूलधन n. ४ a large letter मोठा वर्ग M, मोठे अक्षर n. ५ सत्ता f. अधिकार m. वाढविण्याचा उपाय m, फायदेशीर साधन n- उपयोग m; as, He has made a C. out of his enemy's position. ६ (obs.) प्रकरण n, बाब f. Capitaliz-sation n. मुद्दल आकारणे n, मुद्दलाचे किंवा मृळ भांडवलाचं रूप देणे. २ मोठ्या अक्षरांनी छापणे n. Capitalize-se v. t. मुद्दलाचे स्वरूप देणे, मुद्दल आकारणं. २ मोठ्या अक्षरांनी छापणे. Capitalist n. पुंजीवाला, भांडवलवाला, मुद्दलवाला, भरणेकरी (?). Capitally adv. प्राणांत शिक्षेने , देहांत शिक्षेने . २ उत्तम रीतीने, उत्कृष्ट रीतीने (colloq.). Cup'itate a. bot. टांचणीच्या शिरोभागासारखा, टांचणीसारखा शिरोभाग ज्या स्त्रीकेंसरास आहे असा, अणकुचीदार, कीलमुंडाकार. Capitation n. शिरोगणना f, शिरोगणती f. २ डोईपट्टी f, माणुसपट्टी f, दरव्यक्तीवरचा कर m. Circulating or floating Capital फिरते भांडवल (कामगारांची मजुरी व कामांत वापरलेला कच्चा माल ह्यांना हे नांव देतात), अस्थाई भांडवल. A fixed Capital स्थिर-कायमचे भांडवल (कारखान्याचा इमला व तेथील यंत्रं, हत्यारे यांना कायमचे भांडवल असें नांव दिले आहे). To hold lands in Capital खुद्द राजापासून जमीन मिळविणे. To make Capital out of (चा) फायदेशीर उपयोग करून घेणे, (क्षुल्लक गोष्टीचा बराच बडीजाव करून) फायदा करून घेणे. Capital stock व्यापारांत घातलेले भांडवल n. To live on one's Capital (मूळ भांडवलांत भर टाकल्याशिवाय किंवा ज्यास्त पैसा मिळविल्याशिवाय) भांडवलच खर्च करणे, पदरमोड करून उदरनिर्वाह करणे. To speak in Capitals कांहीं शब्दांवर जोर देऊन बोलणे, कांहीं शब्द ठांसून उच्चारणे. Capitation-tax डोईपट्टी.

Capitol ( kap'it-ol) [ L. capitolium, from L. caput, the head. CAPITOLIUM हे प्राचीन रोमन लोकांच्या 'ज्युपिटर' देवाच्या देवळाचे नांव आहे. कारण ह्या देवळाचा पाया खणीत असतांना (CAPUT ) मनुष्याचे डोके सांपडले होते. ज्या टेकडीवर हे देऊळ बांधलें होतें त्या टेकडीलाही CAPITOLIUM असें नांव पडलें होतें, व ह्या टेकडीवरच प्राचीन रोम शहरांतील राज्यव्यवस्था ठरविण्याकरितां सभासद जमत असत.] n. प्राचीन रोम शहरांतील ज्युपिटरचें देवालय. २ रोमी सभासदगृह. ३ अमेरिकेंतल्या युनायटेड् स्टेट्समधील राष्ट्रीय सभा भरण्याची वाशिंगटन् येथील जागा. 'क्यापिटाल.' Capito'lian, Capit'coline a. ज्युपिटरच्या देवालयासंबंधी-देवालयाचा.

N. B. Senate सभासदमंडळ, सभासदगृह, मंत्रिसभा. Syndicate तंत्रीसभा, कारभारीमंडळ, कार्यकारी मंडळ. Capitulate ( kap-it'ūlāt) (L. capitulare, to arrange - under heads, from caput, the head. ] v. i. (obs.) -draw up in articles कलमबंदी f करणे, कलमवार