पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/575

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cape (kāp) n. the neck-piece of a cloak साहेब लोकांचे केप नांवाचें उपवस्त्र n, हे गळ्याभोवती बांधितात व निम्या पाठी व छातीपुरतें असतें. - Capelin, Caplin (kape-lin) n. केपेलिन नांवाचा समुद्रांतील एक लहान मासा. हा ग्रीनलंड, आइसलड, न्यूफाउंडलंड व अलास्का यांच्या किनाऱ्यावर फार आढळतो. याचा काडमासा धरण्यासाठी आमिषासारखा उपयोग करितात. Capella (ka pella) n. astrom. ब्रह्महृदयतारा m. (हा ओरीगान नक्षत्रांतील एक मोठा चमकणारा तारा आहे.) सार (थि) थ. Caper (kaper) [L. capparis, the caper.] n. केपर नांवाचे झुडुप n, तिळवण वर्गातील एक वनस्पति f. Caper tea एक प्रकारचा केपर नांवाचा काळा चहा m याची पाने थोडी कुरळ असतात. Caper (kaper ) n. डच लोकांचे लुटारू जहाज n, केपर Caper (ka'per) [L. caper, a he-goat.] v.i. उड्या मारणे, नाचणे, खिदळणे. [To BOUND OR C. As , HORSE चौक चालणे. To JUMP AND C. ABOUT As A CHILD टिणटिण-टणटण उड्या मारणे.] C.n. उडी f, नाच m. Caperer n. बागडणारा. Capers, Capering n, (v. V.)-act. खिदळणें , नाच m,. उडया f. pl [Wild capering बोकंदळ.] To cut a caper आनंदाने उडी मारणे, बागडणे.

Capias (kapi-as) [L. capere, to take.] n. law कैदी पकडण्याचा हुकुमनामा m. (जामीन घेऊन किवा गुन्ह्याची नाशाबिती होऊन सोडीपर्यंत या हुकुमनाम्याचा अम्मल असतो.) Capillament (ka-pila-ment)[L. capillus, hair.) n. obs. (के) केंसर n, तंतु m. २ anat. (R) केशवाहिना f. Capillary (kapil-a-ri) [L. capillas, hair.] a. small hair केसासारखा बारीक, केशतुल्य, केशसदृश, अतिसूक्ष्म. C. attraction केशाकर्षण n. Capillary n. anat. केशवाहिनी f, सूक्ष्म नाडी f, सूक्ष्मवाहिनी f, केसाच्या आकृतीची वाहिनी, केशवाहिनी (शुद्ध अशुद्ध रक्त वाहणाऱ्या नाड्यांना जोडणारी), केसासारखी वाहिनी.

Capilla ceous a. अतिसूक्ष्म, केसासारखा Capillarity n केशाकर्षण. Capillose a. केसाळ (R) Capillary orifice कैशिक मुख, कैशिक छिद्र., capilary tube कैसासारखी सूक्ष्म नळी, केशतुल्य नालिका f. Capillary vessel केशतुल्य वाहिनी. Capilliform a.केशाकृति.

Capital ( kap'it-al) [L. caput, the head.) a. (obs) relating to the head or top मस्तकासंबंधी, शीर्षण्य, मूर्धन्य, वरला, वरचा, वरील. २ principal मुख्य,श्रेष्ठ, अप्रणी, अग्रगण्य; as, A. C. city. ३ प्राणांतिक, प्राणात, देहांत, मरणांत; as, A C. punishment. ४ noble excellent खासा, नामी, उमदा, शेलका, उत्कृष्ट; अस A C. speech. ५ देहांत शिक्षेचा, मृत्युदंडाई, as. A C crime. 6 मोठा as A. C. latter c n. archi