पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अथवा चित्राचा एक भाग m. ३ ढालेच्या उजव्या बाजूस केलेली खूण f. C. V. t. वर्ग करणे, भाग-जिल्हे करणे. २ छावणीची जागा वांटू न देणे. Can'tonal a. परगण्याचा. Cantonment n. छावणी f, लष्कर n.

Cantor (kan'tur) [L. a singer, from canere, to sing. ] n. obs. a singer गाणारा, गवई m, esp. the leader of a church choir ख्रिस्ती देवळांतील सेवाधारी गवयांचा नायक, क्यान्टर. Can'toral a. क्यान्टरासंबंधी, खिस्ती देवळांतील मुख्य गायकासंबंधी. Cantoral staff मुख्यसेवाधारी गवयाची यष्टि f. (ताल दाखविण्याकरितां). Cantoris a. गवयासंबंधी, मुख्य गवयासंबंधीं.

Canty (kan'ti ) a. आनंदी, उल्हासी. Can'tiness n. Canvas (kan'vas) [ L. cannabis, hemp.] n. क्यानव्हास, किंतान n, त्रिवटा m, ताट m. २ fig. (a) जहाजाची शिडे. (b.) चित्र n. C. a. चिवट्याचा, ताटाचा, किंतानाचा, चिवंटी. C. v.t. क्यानव्हास घालणे-बसवणे. Canvas-climber n. खलाशी. Canvasback n. क्यानव्हास रंगी पिसांचें बदक n. Canvas-stretcher n. चित्रे काढण्याकरितां क्यानव्हास ताणण्याचा फळा m, क्यानव्हासफळा m. Under the canvas शिडे सोडलेली आहेत अशा स्थितींत. २ वर निशाण फडकत असलेल्या तंबूत, तंबूत; as, " A life under canvas in the finer seasons of the year."

N. B. क्यानव्हास पुष्कळ प्रकारचा असतो, तो विरविरीत असतो व घट्टही असतो. लोकरीच्या विणकामांत तेलकट-रंगाची चित्र काढण्यांत व इतर वस्तु करण्यांत त्याचा उपयोग करितात. Canvass (kan'vas) [ From Canvas. ] v.t. बारकाइने शोध करणे, छानणे, छान करणे, छडा m. - झाडा m, शोध m- लावणे-काढणे-करणे. २ वाटाघाट करणे, वादविवाद करणे, (गिन्हाईक, कामधंदा, वर्गणी इत्यादि) आर्जव-प्रार्थना-विनंति करून मिळविणे. C.v.i. to solicit votes एखाद्याकरितां मतें गोळा करणे, खटपटीने मत मिळविणे (with for ). C. n. शोध m. २ वाटाघाट f, वादविवाद m. ३ आर्जव f, प्रार्थना f, मत मिळविण्याची आर्जवपूर्वक खटपट f- प्रयत्न m. Can'vasser n. Cany (kāni) a. made of canes वेताचा, वेतसमय, वेतसप्रचुर. Vide Cane. Caoutchouc (kow'chuk) [Fr. caoutchouc, from Caribbean Cahuchu. n. India-rubber रबर m.

cap (kap) [A. S. ceppe, cap, cape, hood, from L. L. cappa, a cap.] n. बसकी टोपी. [OPPOSED TO HAT. साहेब लोकांत वृद्ध पुरुष, स्त्रिया व मुलें बहुधा बसकी टोपी (CAP) वापरतात. C. WORN BY WOMEN AND CHILDREN ( AMONG THE HINDUS ) टोपडे (रे) n, कुंचडे n, टकोचें. C. THAT COVERS THE EARS कानटोपी]. २ बसक्या टोपीसारखें शिराच्छादन. ३ खूण म्हणून घातलेली अधिकाराची किंवा हुद्याची टोपी. ४ टोपी काढून केलेला नमस्कार-रामराम m; as, " He that will give a cap and make a leg in thanks.” ५ a cap-like covering of any kind शेंब, शेंबी f , टोपण n, (टोपीसारखे) झांकण. ६ (a) archi. मथाला m, स्तंभशीप.