पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/565

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयूष्याची प्राणाची ज्योत.f. Candle-berry n. क्यान्डलबेरी झाड n. २ क्यान्डलबेरी फळ n. यालाच इंग्रजीत Wax-myrtle ह्मणतात. Candle-bomb n. मेणबत्तीवर धरल्याबरोबर फुटून जाणारा पाण्याने भरलेला कांचेचा गोळा m. Candle-coal n. (same as Cannel-coal). Candle-dipping n. साच्यांतून मेणबत्त्या करण्याऐवजी त्या पाण्यात बुडवून करण्याची रीत f, सांच्याशिवाय वातीवर मेण चढवून मेणबत्ती तयार करणं. Candle-end n. मेणबत्तीचा जनुन राहिलेला शेषभाग m. Candle-holder n. (दुसरा काम करीत असतां त्याला उजेड दिसावा ह्मणून) मेणबत्ती धरणारा, मशालजी. २ दुसऱ्यास अल्पस्वल्प मदत करणारा. Candlelight n. मेणबत्तीचा उजेड m. २ मेणबत्ती लावण्याची वेळ f. Candle-lighter n. मेणबत्त्या लावणारा, मशालजी. २ मेणबत्ती लावावयाचा कांकडा m. Candle -power n. (प्रमाणभूत) मेणबत्तीची प्रकाशकशक्ति f , तेजस्सामर्थ्य, एका मेणबत्तीचा प्रकाश m. Candlestick n. (नळीसारखें) मेणबत्तीचें घर n. Candlewaster m. रात्री फार वेळपर्यंत अभ्यास करणारा. Candle-wood m. क्यान्डल वुड नांवाचे झाड n. अमेरिका व मेक्सिको येथे राळेसारखी पेटणारी झाडे. To burn the candle at both ends, see Burn. Not fit to hold a candle to another एखाद्याशी तुलना करण्यास अयोग्य.as; “Edith is pretty, very pretty; but she can't hold a candle to Nellie." २ चा दुय्यम होण्यास अयोग्य; as, "Others aver that he to Handel is scarcely fit to hold & candle." To hold the candle to the devil असत्याला-दुष्कृत्याला उत्तेजन देणे. To smell of the lamp or candle रात्रीचा दिवस करून पुष्कळ श्रमाने (लेखन) तयार केल्याचा वास येणेची झांक मारणे, स्वाभाविकपणा जाऊन कृत्रिमता भासणे. The game is not worth the candle ह्या खटपटींत श्रमाचे चीज होणार नाही, ह्या कामांत मेहनतीसारखें फळ नाही. To sell by the candle किंमत येईल तेथपर्यंत चढविणे, मेणबत्ती संपेपर्यंत लिलावांत येईल त्या किंमतीस माल विकणे. Candle-auction एक इंच लांबीचा मेणवातीचा तुकडा जळेपर्यंत लिलावांत जो ज्यास्त किंमत करील त्याला माल विकण्याची रीत . ईस्ट इंडिया कंपनीचा माल सतराव्या शतकांत लंडन बंदरांत या पद्धतीने विकीत असत.

Candlemas (kan'dl-mas) [A. S. candel, candle + mcesse, mass.] n. 'कॅन्डलमास,' नांवाचा सण m, पवित्र कुमारी मरीया ( Mary) इचे शुद्धीकरण नामें सणाचा दीपोत्सव m, (हा दुसऱ्या फेब्रुवारीस होतो. ह्या उत्सवाचे वेळी पुष्कळ मेणबत्या लावतात.)

Candour (kan'dur) [See Candid.] n. candidness निष्कपटपणा m, मनाचा मोकळेपणा m, सरलभाव m, सरल बुद्धि f, सालसाई f, दिलपाकी f. २ स्वतःचे अपराध झांकण्याची बुद्धी नसल्यामुळे दिसून येणारा न्यायीपणा m, स्वभावाचा उघडेपणा-खुलेपणा m. Also Candor.



-