पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/558

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Calum'nious a. तुफानाचा, बालंटाचा, कुभांडाचा, चुगलीचा, तुफानी, बालंटी, कुभांडी, अपवादक, मिथ्याभिशंसी. Calum'niously adv. तुफान घेऊन , चहाडी करून, आळ घेऊन. Calum'niousness n.

Culvary (kalva-ri) (L. calvaria, a skull, from calva, a bare scalp.] n. खिस्ताला जरूशलेमनजीक ज्या एका लहान टेकडीवर क्रूसावर चढविले ती टेकडी f जरुशलेममधील 'कवटी,' (क्यालव्हरी) नांवाची टेकडी f क्यालव्हरी. २(उघड्यावर उभी केलेली) क्रूसावर चढविलेल्या ख्रिस्ताची मूर्ति f, क्यालव्हरी. ३(सामान्यार्थ) क्यालव्हरीचा देखावा m, रोमनक्याथेलिकांचं रोमनक्याथेलिक देवळांत किंवा प्रार्थनामंदिरांत (दाखविलेला) क्यालहरी टेकडीवरील खिस्ताला फाशी दिलेल्याचा देखावा m, निस्तवधाचा देखावा m.

N. B.- क्यालव्हरी हा शब्द जशाचा तसा मराठीत घेतला आहे. वर दिलेला पहिला अर्थ विशंपनामासारखा आहे, व दुसरे दोन अर्थ त्या शब्दाला लक्षणेने प्राप्त झाले आहेत.

Calve (Kav.) [A. S. cealfian, see Calf.] v. i. वांसरू वत्स-जावपें-जोपे-जापे देणे-घालणे. २ विणे, पसवणे, प्रसवणे, जन्मणे. [That calves yearly वर्षवीण, समस्की, सामासी (शी), सामासकी. That has twice calved दुजाईत, दुवेती, दोहों वितांची.] Cal'vish a. वांसरालारखा. २ मूर्ख Calvinism (kal'vin-iam) n. कालव्हिनचा पंथ m. जान कालव्हिन हा १६ व्या शतकांतील फ्रेंच सुधारक व विद्वान् शास्त्री होता. Calivinist n. कालव्हिनपंथी. Calvinistic-al a. कालव्हिनपंथाचा. Calvinize v. t. कालन्हिनपंथी करणे.

N. B.-The particular doctrines of theological Calvinism are (1) Particular Election, (2) Particular Redemption, (3) Moral Inability in a fallen state, (4) Irresistible Grące, (5) Final Perseverance. For the meanings of these words in Christiun Theology, see the word Theology.

Calvity (kal-viti) [L. calous, bald.] n. बुच्चेपणा m, सुनेपणा m, टकलेपणा m. pl. calvities. Calx (kalks) [L. calec, lime.] n. भस्म , spec. राख f, खाख f. [Some of the calces are ताम्रभस्म, पारदभस्म or रसभस्म, प्रवालभस्म, मौशिकभस्म, लोहभरम, वंगभस्म, सुवर्णभस्म, माक्षिकभस्म, अभ्रकभस्म, गंधकभस्म, हीरकभस्म, रत्नभस्म.] २ lime (R) कळीचा चुना m. ३ broken and refuse glass, returned to the pots मोडक्यातोडक्या कांचा. pl. Calxes, Calces. Calyptra ( ka-lip'tra ) [Gr. kalyptra, le veil. ] n. bot. पुट m, आवरणकोश m, पटल n, पिधानकफणा m. Calyptrate a. आवरणकोश असलेला. Calyz'triform, Calyp'trimor phous a. पिधानक फण्यांच्या आकाराचा. Calyx, Calix (kāl'iks ) [Gr. kalyx, kalyptein, to cover.] n. bot. the outer covering of a flower