पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/551

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परागंदा झाला होता तेव्हां एरनने सीनाई पर्वतावर बसविलेला पुतळा m. २ fig. सर्वशक्तिमान पैसा m; as, We all worship the golden calf आह्मी सर्व पैशाला भजतो. Half calf (वासराच्या) चामड्याची पाठ व कोपरे असलेली बुकांची बांधणी f, चामड्याची अर्धी बांधणी f. Mottled calf नखिया मारबलाची उंची बांधणी f, चित्रविचित्र चामड्याची बांधणी f. Smooth calf गुळगुळीत चामड्याची बांधणी f. Tree-calf (वृक्ष शाखेच्या) वेलबुट्टीची चामड्याची पुस्तकाची बांधणी. The calves of our lips fig. an offering of praise तोंडाची स्तुति f.

N. B.-वत्स हा शब्द अगदीच लहान पारडाला किवा ताट्याला लावतात. जावपें, जो, जायपे, जोप हे शब्द सापेक्ष आहेत. ह्या म्हशीचें हें कितवें जावपे-जोपें &c. असा प्रयोग सदाेदित हातो. Pen for calves म्हणजे खुडी ह्याला कोठे आधार सांपडत नाही. हा शब्द क्यान्डी साहेबांच्या कोशांतून दिला आहे. पा. हा शब्द फारसा प्रचारांत नाही. Calf (käf) [Cf. Icel. kalf.) 12. (of the leg) पायाची पोटरी f, पोठ (ट) री f. २ (of the stocking) पोटरीचा भाग m. Calf-less a. पातळ पोटरी-चा-असलेला.

Caliban (kal'i-ban) n. Shakes. a man of beastly nature पशुवृत्तीचा मनुष्य m. Calibre, Caliber (kal'i-bir) [Fr. calibre.-Sp. calibre, bore, diameter-or perhaps. L quabibra , of what weight, hence of what size, first applied to a bullet or ball.] n. तोफेचा खजिना-पोट-पोकळी f (तोफेच्या-बंदुकेच्या तोंडाचा) व्यास-रुंदी.f; as, The of empty tubes. २ गोलाचा व्यास m. ३ capacity आवांका m, अटोका m, पोहोंच f. m, क्षेत्र n, विस्तार m, तणावा m, ग्राहकशक्ति f. ४ प्रकार m, जात f. ५ fig वजन n. Calibered a. Calibrate v.t. (तोफेचा) परीघ मापणे. २(बुद्धीची) ग्राहकशक्ति मापणे. ३ (अंशाच्या खुणा करण्याकरितां उष्णमापकची ) पोकळी माेजणे Calibration n. ग्राहकशक्तिमापन n. २ नळाीची पोकळी मोजणे n.

Calices (kal'is-es ) n. (in the kidneys) med. मूत्रपिंडस्रोतसें, मूत्रपिंडांतील छिद्रे. Calico (kal'i-ko) [Sp. because first imported from, Calicut in the East Indies. Cf. Fr. Calicot.} m. cotton cloth कापसाचे कापड n, कार्पासवस्त्र, कालिकाे n. २ printed cotton cloth. छीट n, चीट n. . कापसाचें. Calico-printer n. चीट छापणारा. Calico printing n. कापडावर चित्रे काढणे, चीट छापणे, चीट छापण्याची कला f.

N. B.-At first, Calico was the general name cotton cloths of all kinds imported from the East now it is applied to various cotton fabrics European manufacture (sometimes also with linen warp). Now in England this word is applied to