पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/548

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

compute, to reckon गणणे, मोजणे, गणित करणं, हिशब करणं. २ to estimate roughly or conjecturally अजमासणे, अदमास-अटकळ करणे, अजमावणे, आकारणं, क्यास अंदाज करणे. ३ astron. गणणे, वर्तवणे, पाहणे; as, To C. one's horoscope. ४ (गणित-हिशेब करून) किंमत करणे. ५ (गणितानं) प्रमाणांत बसवणे. ६ (शोधपूर्वक-हिशेबाने) योजणे, जुळेसा करणे; as, You must C. a good set of laws for this association. C.v.i. गणना करणे, अजमावणे. २ मागचापुढचा विचार करणे; as, A fool never C.s. ३ (with on or upon) वर्तवणे, अटकळ बांधणे. Calculable a. (v. V.). गणनीय, गण्य, परिगणनीय, संख्येय, विचारणीय. Calculated p. & a. (v. V.) गणलेला, अजमासलेला, हिशेबानें-गणिताने योग्य ह्मणून ठरलेला, वर्तवलेला, &c. &c. Calculating a.collog. हिशेबी, गणिती (?). २ सदोदित नफानुकसानीचा हिशेब करणारा, धोरणी. ३ loosely लोभी, स्वार्थपरायण. Calculation n. (v. V. N.) act गणणे n, गणन n, गणना f, हिशे (शो) ब m. a. or s. गणती f. [Time as CALCULATED BY OR IN MANY YEARS, months, &c. वर्षोंगणती f, सालोगणती f, महिनोगणती f, &c. Quantity as calculated by or in many khandis, maunds, shers, खंडोगणती, मणोगणती, शेरोगणती. Number as calculated by many lacs or hundreds. लक्षोगणती, सहस्रोगणती, &c. (v. लाग, Ex. या गोष्टीला वर्षोंगणती लागतील.) RUSTIC OR RUDE C. कुणबी हिशेब m.] २ act. अजमासणें n, अजमास m, अंदाज m, क्यास m, कयास m, अटकळ f. ३ act. गणणे n.&c. ४ result of a C. ( Loosely) गणित n, शेवटचा आकडा m, गणितफल n, उत्तर n. Calculative a. हिशेबी, हिशेब किंवा गणित करण्याची शक्ति-संवय असलेला, गणनायोग्य, गणनशील, गणनक्षम. २ गणिताचासबधी, गणित करणारा. Calculator n. (v. V. N.) गणणारा, गणती करणारा, विचारी, गणक, हिशोब करणारा. २ अजमासणारा, आकारणारा, बरोबर अजमास करणारा. ३ गणक, वर्तवणारा, (पत्रिका वगैरे) पाहणारा. ४ गणनयंत्र, हिशेब करण्याचे यंत्र n. Cal'eulatory a. गणनेसंबंधी, गणिताचा, हिशेबाचा, गणनात्मक.

calculus (kalku-lus) [L. calculus, a pebble. ] m. खडा m. [Urinary calculus मूत्रांतील क्षार कठिण होऊन झालेला खडा m, मूतखडा, मूत्राश्मरी, अश्मरी. Renal calculus मूत्रपिंडाश्मरी. vesical calculus बस्तिगत,अश्मरी, मुत्राशयाश्मरी. Biliary calculus पित्ताश्मरी. Prostatic calculus बस्तिपिंडाश्मरी prostate बस्तिपिंड). Intestinal calculus अंत्राश्मरी. See the words Renal, Vesical, Prostatic.] & math. एक उचचगणितशाख f. कलन n. pl Calculi. [CALCULUS OF FINITE DIFFERENCES परिछिन्न-अंतरकलन, 'CALCULUS OF FUNCTIONS. math. कर्मकलन; CALCULUB OPERATIONS math. कर्मकलण . CALCULUS OF VARIATIONS MATH REE VARIATION. EXPONENTIAL CALOULUS math. घातकलन. IMAGINARY CALOULUB