पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/544

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुशामत करणे, गोड बोलून ठकवणे, बाबापुता-दादापुता करणे [ I CAJOLE IS GENERALLY FOLLOWED BY ‘INTO 'FROM' 'OUT OF'; AS, "NOR TO CAJOLE OR FLATTER YOU INTO THE RECEPTION OF MY VIEWS"; "HE COULD NEITHER: BE CAJOLED Nor TERRIFIED FROM His AYOWAL OF THE TRUTH;" "EVERYBODY WOULD NOT HAVE CAJOLED THIS OUT OF HER;" "THE STOCKINGS WHICH SHE CAJOLED HIM OUT OF."] Cajole'ment n. Cajol'er 2. गोड शब्दांनी-रिझवणारा.

Chjuput, Cajeput (ka.ji-put ) [Of Malayan origin karu, tree & Putih, white.] n. (मलायाकडील) काजुपुट नांवाचे झाड . २ काजुपुटी-कायाकुटी तेल n. ह तेल काजुपुट झाडाच्या पानांपासून काढलेले असते. याचा रंग हिरवट असतो, व याला कापरासारखा वास येतो, याची रुचि तिखट असते, हे पेट लवकर घेते व दुर्गधि मोडते. Cajuputene n. काजुपुटी तेलांतील कार्यकारी द्रव्य, काजुपुटी वीर्य.

Cake (kak) [ M. E. cake, of Scand. origin. साहेव लोकांचे "केकनामक" पक्कान्न, हे कणीक किंवा इतर पीठ, साखर, लोणी, अंडी, सुक्या मनुका, बदाम, वेलची, लवंग, इत्यादि पदाथाचे केलेले असते. आपल्याकडील पुरणपोळी, साखरपोळी, गवसणीची पोळी, करंजी, खाजी, करंजी, कानवला, गुळपापडी, कडयू, गणा, घावन or ना, गुरोळी, पापडी, पुरी, मालपुवा, अपूप or पूप, धीवर, भांडा, चिरोटा, अनरसा, घारगा, सांजोरी, सांज्याची पोळी यांचं इंग्रजीत Cake या सामान्य शब्दाने भाषांतर करण्याची रूढि पडली आहे. परंतु 'केक' हा पदार्थ डोळ्याने पाहिल्याशिवाय त्याची कल्पना यावयाची नाही. तो रुंदट असून उंचट व वाटोळसर असतो. हिंदुलोक पोळ्यांत अंडी वापरीत नाहीत हेही लक्षात ठेविले पाहिजे. साहेब लोकांत Plum-cake, tea-cake, Wedding-cake असे 'केक' चे प्रकार आहेत. आपल्याकडील, रोटी, चपाती, चकदळी, चांदकी, (colloq.) दामटी, चांदकली, पोपी, पोपली, हे शब्द इंग्रजी Bread शब्दाखाली मोडतील. Bread भाकर व Cake साहेबी पोळी असे प्रतिशब्द बहुतेक निश्चित झाल्यासारखेच आहेत.] n. साहेबी पोळी f, साहेबी गोडें पक्वान्न n, साहेबी तऱ्हेच्या पुरणाची पोळी f. २ पोळी, पोळीच्या आकाराचा पदार्थ m. as, A fish-cake, Potato-cake, Pan-cake. ३ a flat and circular mass वाटोळी वडी f, चाकी f, चाती f, चकती f, वडी f. as, Paint-cake, Wax-cake, Soap-Cake. ४ कवंद, खरपुडी, खपला, खपली, as, A cake of coagulated blood. ५ खाप.f; as, A cake of tobacco. [A CAKE FLATTENED WITH THE HAND WITHOUT THE ROLLER थापटुन केलेली पोळी, हातावरची-हातावर केलेली पाळी. THE EIGHTH PART OF A CAKE OR BREAD नितकोर m. THE FOURTH PART OF A CAKE OR BREAD चतकोर OR चतकर m, चौतकोर f. PILE OF CAKES चवड f. SMALL CAKE OR FLAT' LOAF चांदकी.f, चांदुकली.f.ROUND BOARD FOR FLATTENING CAKES ON पोळपाट m. ROLLER FOR FLATTENING CAKES लाटणे n, लाटणी f.] Cake V. t. वडी F- पोळी F. करणे, (पोळीसारखा) घट्ट-कडक

करणे, वडीसारखा करणे, वडी बनविणे. O.v.i. जमणे, गोठणे,