पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/537

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

purloin to pilfer, to pick खाणे, चापसणे, चापणे, ताव m, देणे with वर of o. २ (शिंप्याने) बेतून राहिलेलं कापड चोरणे. ३.fig. खाणे, वर ताव देणे. C. n. बेतून राहिलेले चोरलेले कापड n. Cabbaln, Cabala (kab'a-la) [ Fr. cabale, see Cabal.] n. 'कब्बाला, 'इस्राएली लोकांच्या धर्मशास्त्राचे परंपरागत भाग्य n, इस्राएली ब्रह्मविद्या f. जुन्या कराराची परंपरेने आलेली गृढार्थद्योतिनी टीका f. ह्या विवरणांत ईश्वराच्या व मनुष्याच्या गूढ स्वरूपाचा विचार केलेला असतो; व शास्त्राच्या मुळांतील प्रत्येक अक्षराला गूढार्थ आहे अशी भाविक इस्राएल लोकांची समजूत आहे. २ गूढविद्या f, गुप्तविद्या f, रहस्यविद्या f. Cabbalism n. कब्बालासंप्रदाय m- मता n, कब्बालापंथ m. २ गूढार्थत्व .n. Cabbalist n. कब्बालावेत्ता m, इस्राएली ब्रह्मविद्यावेत्ता m. Calbalist-ic,-al a. कब्बालासंबंधी, गुप्त, गुह्य, गृढार्थक. [C. LETTER गूढार्थक अक्षर n.] Cabbalistie. ally adv. कब्बालाला धरून, कब्बालासंप्रदायाप्रमाणे, गूढार्थाला धरून, इस्राएली ब्रह्मविद्येच्या अनुरोधानें. Cabin (kabin) [Fr. cabane, a cabin.] n. 'केबिण, खोली f, खण m, पयाल (ळ) , (अमलदाराची किंवा जास्त भाडे देणान्या उतारूंची गलबतांतील) खोली f. २ cottage खोपट n, dim. खोपटी f, झोपडी f.३ (obs. ) तंबू m, राहुटी f. C. v.i. गलबतांतील खोलीत राहणे.C. V. t. गलबतांतील खोलीत घालणे. Cabin-passenger n. (गलबतांतील) केबिणींतला उतारू m. Cabin-boy n. खोलीचा तैनाती नोकर m, केबिणनोकर m. Cabinet ( kab'in-et) [Fr. cabinet, a closet.] n. ( obs.) लहान खोली.f. २ a private council-room खलबतखाना m, खासदिवाणखाना m, मंत्रिगृह n, मंत्रगृह n. ३ a select body of minister's मुत्सद्दीमंडळ n, खलबत करणारी मंडळी f, मुख्य मंत्री m, pl, मुख्य प्रधान m, pl, मुख्य मंत्रिमंडळ n, मुख्य प्रधानमंडळ n. ४ a box of drawers, cells, &c. नकशीदार खणांची पेटी f, खानेदारपेटी.f. ५ (Shakes. ) जनावरांची राहण्याची जागा, पक्ष्यांचे घरटें n. The Cabinet (राज्यसूत्रे हांकणारें) मंत्रिमंडळ n. Cabinet-council n. (earlier name for the cabinet) राजाच्या मुख्य मंत्र्यांची सभा f. २ निवडक मंत्रिजन n, मंत्रिमंडळ n. Cabinet-edition n. खासगी खोलीत ठेवण्यासारखी (पुस्तकालयांतील प्रतीपेक्षा आकाराने व किंमतीने) लहान प्रत f. Cabinet-maker n. नकशीदार पेट्या व इतर लांकडी काम करणारा सुतार m. Cabinet-photograph n. कार्डापेक्षा मोठ्या आकाराचा. मध्यम आकाराचा प्रकाशलेख m, खोलीत ठेवण्याचा प्रकाशलेख m. Cabinet work n. गृहोपयोगी लांकडी सामानावर नकसकाम करण्याची कला f, गृहोपयोगी लांकडी सामान n, उपस्कर (S) n. Cable ( kā’bl) [M. E. cable.---o. Fr. cable.-L. L. capulum, caplum, & strong (holding ) rope.-L. capere, to take.] n. लंगरदोर m, दोरखंड m,राजू m. (हा सुमारे ६०७ फूट लांब असतो व

हा लोखंडाच्या कड्यांचा