पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. परंतु C, p, s, B ह्या अक्षरांचा प्रकार तसा नाही. यांच्यापुढे स्वर तर येतातच; परंतु काही व्यंजनही येतात; जसें, al, or, pl, pr, bl, br, sp, sl, sn. कांही अक्षरांपुढे तर दोन दोन व्यंजने येतात; जसें, spr (spring), pl (split). ह्यामुळे c, s इत्यादि अक्षरांतील शब्दसंख्या फार वाढते. B अक्षरांतील शब्दसंख्येचा चौथा हिस्सा bl आणि br ह्या व्यंजनद्वयाने सुरू होणाऱ्या शब्दाचा आहे. तसेंच C अक्षरांतील एक पंचमांश शब्द cl, cr, chr ह्या व्यंजनसंयोगांनी सुरू होतात. ह्या वरील स्पष्टीकरणावरून C अक्षरांतील शब्दसंख्या वाढण्याचे एक ठळक कारण वाचकाच्या लक्षात येईल. C अक्षरांतील शब्दसंख्या वाढण्याची तीन विशेष कारणे आहेत. पहिले विशेष कारण, स्थूलमानाने विचार करता C अक्षरांतील जवळजवळ एक पंचमांश शब्द ch या व्यजनसंयोगाने सुरू होतात आणि अशा शब्दांच्या मूळ उत्पत्तीचा व उच्चाराचा जर विचार केला तर हे शब्द स्पॅनिश, वेल्श व वोहिमिअन ह्या भाषांच्या कोशाप्रमाणे Ch. ह्याच संयुक्त व्यंजनाखाला निराळे देतां येतील. परंतु इंग्रजी भाषेच्या अर्वाचीन लेखनपद्धती प्रमाने त्यांचा C अक्षरांतच अंतर्भाव केल्यामुळे C ची शब्दसंख्या फार वाढली आहे. C ची शब्दसंख्या वाढण्याचे दुसरे कारण असे कि . Ce, Ci, Cy ह्या अक्षरांनी प्रारंभ होणारे स् या उच्चाराचे C मध्येच घेतले आहेत. त्यामुळे C ची शब्दसंख्या फार वाढली आहे. जे शब्द पूर्वी C ह्या अक्षराने सुरू होत असत सध्यां K ह्याने सुरू होतात. ह्यामुळे C मधले कांही जुने शब्द कमी झाले आहेत खरे; परंतु अशा गळलेल्या शब्दांची संख्या फार थोडी आहे. C ची शब्दसंख्या वाढण्याचे तिसरे विशेष कारण con contra किंवा ह्यांची रूपांतरें Co, Col, Com, Cor आणि counter ह्या लॅटिन उपसर्गाचे शब्द c मध्ये पुष्कळ आहे हे होय. Ch अक्षरांनी सुरू झालेले शब्द बाजूला ठेवून बाकी राहीलेल्या c च्या शब्दसमूहांत जवळ जवळ निम्मे शब्द Co ह्या अक्षरांनी सुरू होतात; व जवळ जवळ एक तृतीयांश शब्द वरील इतर उपसर्गानी सुरू होतात.c ह्या अक्षरांतील शब्दांच्या घटनेचा अभ्यास करणाऱ्यास तत्वतः इंग्रजी भाषेतील शब्दघटनेचा अभ्यास केल्याचे श्रेय मिळेल. कारण C ह्या अक्षरांत इंग्रजी भाषेच्या न उगमांतून आलेले शब्द आहेत. ट्युटॉनिक आणि स्कॅन्डीनेव्हिअन भाषांतून, नॉर्मन-फ्रेंच भाषेतून, सरळ लॅटिन भाषतून' फ्रेंचच्या किंवा इतर एक किंवा अनेक युरोपियन भाषांच्या द्वारे लॅटिन भाषेतून, " सरळ ग्रीक भाषेतून, लॅटिनच्या किंवा इतर एक किंवा अनेक भाषाच्याद्वारे ग्रीक भाषेतून, सेल्टिक भाषेतून, स्पॅनिश, पोट्र्युगांज व इटॉलियन व फ्रेंच भाषांतून, इतर युरोपस्थ भाषांतून, हिब्रू, अरॉबिक,पारसी, तुर्की व इतर पौरस्त्य भाषांतून, असे सर्व प्रकारचे शब्द c च्या शब्दसमूहांत आहेत व पुढे दिलेल्या Come, Cast, call, cattle, Council, Country, Court, Conduct, Cross, cathedral, Cholera, Clergy, Church, Cairn, Crag, castle, cork, Crusade, Cupola, Coach, Czar, Cherub,caravan, Coffee, Check, Chess, Chouse, Calico, Camphor, cash,cacao,Canoe शब्दांच्या व्युत्पत्तीचा अभ्यास केल्यावर वर केलेले विधान वाचकांस स्पष्ट होईल.

Caaba (kä'a-ba) [Ar. ka'bah, & square building n काएबा, मुसलमान लोकांची मक्केतील अति पवित्र मशीद f हे त्यांचे महायात्रेचे सर्वांत श्रेष्ठ स्थळ आहे. २ ह्या मशिदीतील आग्नेयी बाजूचा काळा दगड m, हा दगड स्वर्गी