पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/534

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

TERN, CYMBAL. जुन्या फ्रेंच भाषेतून किंवा जुन्या इंग्रजी भाषेतून जे क् उच्चाराचे C-अंत्यशब्द सध्यांच्या इंग्रजी भाषेत आले आहेत, त्यांत मूळ C च्या ऐवजी K किंवा ck. ही अक्षरे घालतात, जसें, BOOC (BOOK), PAC (PACK), MEEC (MEEK). कारण हा फेरफार केल्यावर अशा शब्दांपासून दुसरे शब्द साधणे सोपे पडतें; जसे, MEEC = MEEK ह्यापासून MEEKER हा प्रयोग होतो; नाहीतर MEECER (मीसर) हा प्रयोग झाला असता. ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून जे C (क्)ने अंत्यशब्द इंग्रजी भाषेत आले आहेत त्यांची शेवटची C तशीच कायम ठेविलेली असते. परंतु काही थोड्या ठिकाणी जेव्हां e.किंवा i.हा स्वर C ला जोडावयाचा असतो तेव्हां C बद्दल Ck लिहावे लागते; जसें, TRAFFIC, TRAFFICKER. जेव्हां स् ध्वनीचे C अक्षर अंत्य असते तेव्हां C बद्दल Ce लिहितात; जसें, TRACE, TERICE. आणि अशा शब्दांपुढें a, o, u हे स्वर आले तरी Ce जशीच्या तशीच रहाते; जसे, TRACEABLE. Ci (कचित् प्रसंगी ce) ह्यापुढे जर एखादा स्वर आला तर त्याचा श असा उच्चार होतो; जसें, PRECIOUS, COERCION]. २ शंभर, C हे रोमन आंकड्यांत शंभर ह्या संख्येऐवजी वापरतात; जसें, CCC=३००. ३ math. a constant कायमची संख्या f पद n. ४ अव्यक्त गणितांततर्कशास्त्रांत-कायद्यांच्या पुस्तकांत C हे अक्षर कोणीएक त्रयस्थ पुरुष किंवा वस्तु दाखविण्याकरितां वापरतात. ५ Charles, Caius, Carbon, Current (of electricity), Centigrade ह्या शब्दांचे मोठे C अक्षर संक्षेपरूप म्हणून वापरतात. व धाकटें c हें अक्षर Chapter, Century, Caught (in Cricket), Canine (teeth) यांचें संक्षेपरूप ह्मणून वापरतात. तसेंच C. A. = Chartered Accountant. C. B. = Companion of the Bath. C. E.= Civil Engineer. C. M. = Master of Surgery, or Common Metre. C. S. = Civil Service. ६ mus. स्वरसप्तकांतील प्रथम स्वराची संज्ञा. षड्जस्वर, षड्जग्रामालाहि हीच संज्ञा दिली आहे. ७ कालमानाच्या दृष्टीने C हे चिन्ह मध्यलयांत चार मात्रांचे द्योतक आहे. म्हणजे एका कलेत ४ मात्रा (क्रोचेट्स) ठरविल्या आहेत आणि C हे चिन्ह द्रुतकालांत २ किंवा ४ अनुदुतांचें दर्शक मानिले आहे. C=Counter tenor उच्चस्वर. C. F. = Canto Fermo गमक-खट्का वगैरे नसलेला साधा स्वर.

N. B.-इंग्रजी भाषेच्या कोशांत S खेरीज करून बाकीच्या कोणत्याही अक्षरांपेक्षां C ची शब्दसंख्या फार मोठी आहे. A आणि B ह्यांपैकी प्रत्येकाची शब्दसंख्या तर मोठी आहे खरीच; परंतु एकट्या C ची शब्दसंख्या A च्या व B च्या मिळून होणाऱ्या शब्दसंख्येइतकी आहे. C च्या शब्दसंख्येचे दुसरें मान पुढे दिले आहे. X, Y, Z, Q, K, J, N, U आणि V ह्या सर्वांची तर ती बेरीज C च्या शब्दसंख्येबरोबर होईल. कोणत्याहि अक्षरातील शब्दसंख्येचे मान साधारण व विशेष अशा दोन कारणांवर अवलंबून असते. पहिल्या प्रथम c अक्षरासंबंधाने आपण साधारण कारणांचा विचार करूं. J, N, V, X, Z, Y ह्या अक्षरांपुढे फक्त a, e, i, o, y, स्वरच येऊ शकतात व कोणतेही व्यंजन येऊ शकत नाही. ह्यामुळे वरील अक्षरांतील शब्दसंख्या फारच थोडी