पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश


पहिला मराठी कोश म्हटला म्हणजे कॅंडीसाहेबांनी केलेली इंग्रजी-मराठी डिक्शनरी आहे. पण ही डिक्शनरी अव्वल इंग्रजी असल्यामुळें गेल्या ५० वर्षात मराठी भाषेच्या शब्द संग्रहांत जी भर पडलेली आहे किंवा भाषेच्या स्वरूपांत जो फरक पडलेला आहे तो कॅंडीसाहेबांच्या डिक्शनरीत आढळुन येत नाही. उलट कित्येक वेळां केवळ या डिक्शनरीच्या साहाय्याने इंग्रजींतून मराठीत भाषांतरें परकीय लोक Sugar-coated याचे 'साखराव गुंठित' असे भाषांतर करून न जाणतां आपणांस व आपल्या भाषांतरास उपहासास पात्र करून घेतात. भाषा हा विषयच असा काहीं नाजूक आहे कीं, जेव्हा एखाद्या भाषेंत नवे विचार व्यक्त करावयाचे असतात तेव्हां ती ज्यांची स्वभाषा आहे त्यांच्या हातून ते जसे व्यक्त होतात तसे इतरांच्या हातून होत नाहीत. मिशनरी लोकांनी केलेल्या बायबलाच्या भाषांतरावरून ही गोष्ट उघड होत आहे. हे मिशनरी किंवा कँडीसाहेब यांना महाराष्ट्रांतील लोकांचे साहाय्य नव्हते असे नाहीं. तथापि एखादी भाषा आपली जन्मभाषा असल्यानें सदर भाषेतील अर्थाचे भेद किंवा इतर स्वारस्य जितके आपणांस अचूकपणे समजतें तितकें तें परकीयांस समजणें कठिण आहे. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे इंग्रजी-मराठी कोशाचे काम प्रो. रानडे यांच्यासारख्या विद्वान् मनुष्यानें हाती घेतले आहे, ही

विशेष समाधान मानण्यासारखी गोष्ट ही कीं, प्रो. रानडे यांनी या कामी अलीकडील निरनिराळ्या पाश्चिमात्य शास्त्रांत प्रवीण असलेल्या बहुतेक विद्वानांचे साहाय्य घेतले आहे; इतकेच नव्हे तर, निरनिराळ्या शास्त्रातील पारिभाषिक शब्द त्या त्या शास्त्रांतील प्रवीण लोकांच्या नजरेखालून जातील अशा पहिल्यापासून तजवीज ठेविली आहे. इंग्रजी भाषेतील निरनिराळ्या शास्त्रांचे ज्ञान आपल्या देशबांधवांस व्हावें याबद्दल महाराष्ट्रांतच नव्हे, तर बंगाल, पंजाब, सिंध, गुजराथ, मलबार, किंवा मद्रास प्रांतांत सुशिक्षित लोकांचे प्रयत्न गेल्या पांच-पन्नास वर्ष एकसारखे चालू आहेत; व ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न सुरू केले आहेत; त्यांस त्यांस सर्व ठिकाणी एकच म्हणजे नवीन शब्दसमूहांची अडचण आलेली आहे आणि ती दूर करण्याबद्दलं प्रत्येक प्रांतांतील विद्वानांचे आपआपल्या परीने प्रयत्न चालू आहेत. गणित, ज्योतिष, शिल्पकला, यांत्रिक ज्ञान, भूगर्भशास्त्र, जीवनशास्त्र, कायदा, नीतिशास्त्र इत्यादि अनेक विषयांवर पाश्चिमात्य विचार देशी भाषांतून उतरण्यास शब्दांची अडचण सर्व ठिकाणी एकसारखीच असल्यामुळे व ही अडचण दूर करण्यास सर्वाच्या दृष्टीने मुख्य साधन संस्कृत असल्याने निरनिराळ्या प्रांतांतून पुष्कळ अंशी एकाच धर्तीवर नवीर शब्दरचना आढळून येते. बडोद्यांत श्री. सयाजीरावमहाराज यांनी काढलेल्या कलाभुवनाकरितां शास्त्रीय परिभाषा निश्चित करून त्याचा कोश करण्याचे काम काही दिवसांपूर्वी चालू होते, व हल्लींहि बनारस येथे नागरी प्रचारणी सभेत तोच क्रम सुरू ठेवला आहे. बंगाल्यांत विश्वकोश म्हणून इंग्रजीत ज्यास एन्सायक्लोपीडिया म्हणतात तशा प्रकारचा एक कोश तयार झाला आहे; आणि निरनिराळ्या प्रांतांतील देशी भाषांतून जी वर्तमानपत्रे किंवा मासिक-पुस्तकें निघतात त्यांतून नवे शब्द, नवी कल्पना किंवा नवी