पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/498

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

ब्रान्झ तयार करणे. Bronz'ing n. ब्रान्झसारखे करून देणे n. Bronz'y a. बिरंजी, ब्रान्झचा. Bronze age or period ब्रांझयुग, लोहयुग आणि पाषाणयुग यांमधील काल. दगडाच्या हत्यारांनंतर आणि लोखंडी हत्यारें प्रचारांत येण्यापूर्वी ब्रान्झधातूची हत्यारे लोक वापरीत असत.
Brooch ( broch) [Fr. broche, a spit. See Broach.] n. वस्त्रांचे छातीवरील अडकवण n (now worn at the breast by women), कपडा ठीक बसण्यासाठी वापरलेला कांटा (दागिना).
Brood (brood) [A. S. brod, a brood.] n. a hatch, the whole hatch वीण f, वीत f, वेत n. २ breed, pro. geny, hatch, &c. वाढा m, बिजवट n. ३ संतान n , संतति f. Brood a. ऊब देण्याकरितां ठेवलेली. २ फळवण्याकरिता ठेवलेली. B. v. t. (wrath or the like) पोसणे, पालन करणे. २ पंखांनी झांकणे, जब देण्याकरितां किंवा विण्याचे वेळी झांकणे. ३ पाखर f. घालणे, सुरकूत f करणें, अंडीn.pl. उबविणे, रोवण घेणे, कुलायनिलाय m. करणे. ४ to think anxiously upon सचिंत विचार करणे. B.v . i. (with over or on) to Ponder over ध्यास m. धरून बसणे, चिंतन-चिंता करीत बसणे, सचिंत बसणे; as, To B. over misfortunes. २ उबवणे, ऊब देणे, पाखर घालणे. Brooding a. सचिंत; as, B. disposition. Broodingly adv. Brood'y a. ऊब देण्याची किंवा उबविण्याची इच्छा असलेला; as, A B. hen.
Brook (bröök) [A. S. broc, a stream, a brook. ] n.ओढा m, नाला m, ओहळ m, पर्ह्या m. A clattering B. खळाळी f.. Dry bed of a B. ओढवण n. Brook' let n. लहान ओढा m. Brooky a. पुष्कळ ओढे असलेला.
Brook (bröök) [A. S. brucan, to use, to enjoy. ] v. t. to bear, to put up with सोसणे, साहणे; as, They cannot B. restraint.
Broom (broom) [A. S. brom, the plant broom; hence, a besom made from the twigs of it; Dut. brem; Low L. braam ; cf. Bramble. ] n. besom केरसुणी or केरसोणी f, झाडू m, झाडण f, झाडणी f ,बुतारा m. dim. बुतारी f, वाढवण f, वाढणी f, मार्जनी f, समार्जानी f, कुंचली f, सळाथी f. [B. OF STRONG AND STIFF STALKS ETİT m. B. OF TWIGS OR CUTTINGS शिरांटा m, सराटा, खराटा. B. WITH HANDLE दांड OR दांडेकेरसुणी. B. WORN TO THE STUMP खुंटारा m, खरांटा m. STOCK OR HINDER PART OF A B. बुंध m, बंधाm, बंधारा m, मुडगा OR मुगडा m. To BEAT WITH A B. बंधारणें, केरसुणीने मारणे.]२ केरसुणीचे झाड. Broomcorn n. ज्याचे झाडू करितात ते झाड n. Broom-staff, Broomstick n. केरसुणीचा दांडा m. Broom'y a. To do marry over the broomstick or to jump the besom कधी प्रचारांत नाही अशा रीतीने लग्न करणे, ह्यांत दोघेजण केरसुणीच्या दांड्यावरून उड्या मारतात. A new broom (एखाधा हुद्यावर) नेमलेला नवीन