पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावतात, रानटी जनावरांच्या जातीला Species आणि मनुष्यांच्या जातीला. Race हे शब्द वापरतात. Breeze (brēz) [M. E. brese; A. S.briosa.] n. (Shakes.) the gadfly गोमाशी. Also written Breese, Brize. Breeze ( brēz) [Fr. brise, a cold wind. ] n. a fresh soft flowing wind मंद वारा m, मंदवायु m,मंदपवन m, झुळुक f, वारेn, वान्याची लहरf, मृदुवात m, मंदानिल m. [BALMY B. मंदसुगंध वायु m. CooL AND BALMY B. शीतसुगंध वायु m. Land B. ( BLOWING FROM E. OR N. E.) मतलईf, रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहणारा वारा, भूमित्यागी-भौम पवन, स्थलपवन. SEA B. समुद्राकडचा वारा m, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारा वारा, समुद्रत्यागी पवन, समुद्रपवन, खारावारा] २.fig., colloq.a disturbance, a quarrel, a row क्षोम m, चित्ताची अस्वस्थताf, वाद m, कलह m, चकमक.f; as, To keep up a B. means to continue a disturbance; The discovery produced a B. Breezeless a. निर्वात, शांत. Breez'y a. हवाशीर, हवेचा. To breeze up जास्त जास्त जोराने वाहणे. Breeze ( brēz) [O. Fr. brese, Fr. braise, cinders, live coals. See Brasier.] n. (विटा भाजतांना वापरलेला) केर , कचरा m, राख f.

Brethren ( breth'ren ) n. members of the same society or profession बंधुजन m, pl., वर्गबंधु m. pl, व्यवसायबांधव, समाजबांधव,जातभाई.२ gener. B. and near relatives भाऊबंद m. pl.
Bretwalda ( bret-wal'da ) [A. S. bret, brylen, wide, powerful & walda, a ruler.] n. सर्व ब्रिटणलोकांचा  अधिराज m. 'ब्रेटवाल्डा,' ही एक इंग्लंडच्या राजांची जुनी पदवी आहे. ही पहिल्याने इंग्लंडचा राजा जो एगबर्ट त्यास दिली होती, त्यानंतर बरेच इंग्रजी राजे ही पदवी धारण करीत असत. ही पदवी हल्ली प्रचारांत नाही. 

Breve ( brēv ) [L. L. breve, from L. brevis, short. ]m. print. -हस्व स्वराची खूणf [-]. २ mus. लघुचिन्ह n, चार मात्रांचा काल दाखविणारे चिन्ह.आर्य संगीतशास्त्रांत तें असें (1) लिहिले आहे. Brevet (brev'et)[Fr.brevet,acommission.L. brevis, short. ]n. राजाकडून देणगी-मान-हक अगर पदवी मिळाल्याबद्दलचा लेख, सन्मानाची-बहुमानाची-&c. सनद f. २ mil. पलटणीतील अधिका-यास त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानार्थक मिळालेला वरिष्ठ अधिकार. कमी पगारदाराने मोठ्या पगारदाराची जागा चालविण्याची सनद f.ही सनद फक्त मानाचीच असते, व ती मुळे ज्यास्त पगाराचा हक्क येत नाही. Brevet'cy n. Breviary (brēv'i-ar-i) [Fr. breviaire.-L. breviarium, from breris, short. ] n. गोषवारा m, सार n, संक्षिप्त वर्णनn . २ (of Roman Catholic and Greek churches) स्तोत्रसंग्रह.

Brevier ( brev-ēr')[... brevis, short. A small type between bourgeois aud minion, originally used