पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर आदळून फुटणारी लाट f, मौजा; as, Surrounded by breakers. ३ एक प्रकारचे पाण्याचे लहान भांडे, जांब, जाम. Breakers ahead संभाळा (पुढे लाटा फुटून उसळताहेत). Breaking n. (v. V. T. 1.)-act. तोडणेn, मोडणेn , &c., भंग m, खंडण n, स्फोट m, स्फोटन n. Break-neck a. lit. & fig. मानमोडा-डी-डें, मान मोडणारा, जीव धोक्यात घालणारा, घातकी. २ head-long मुसंडी, खूब जोराचा; as, B. speed. ३ precipitous सुळ्यासारखा, तुटलेल्या कड्याचा; B. road,-rock. Break-water n. पाणी थोपविण्याकरितां-अडविण्याकरि तां केलेला बांध m-भिंत f,बंधारा -&c., ढकशीf, थोप f. Break, Same as Brake.

Breakfast ( brek'fast ) n. प्रातरन्न n, प्रातर्भोजन n, न्याहारीn. २ उपास सोडणे n. B.v.i. न्याहारी-&c. करणे . B. v. t. to furnish with breakfast ETİ परविणें: 2s, We breakfast him to-day. Breakfasting n. न्याहारी करणे. २ उपास सोडणे, उपासानंतर जेवणे. Breakfast-set न्याहारीची भांडी n.pl.
Breast ( brest) [ A. S. breost, swelling.] n. उर n, (pop.) जर m, छातीf, उरःस्थलn, वक्ष n, वक्षःस्थल n, loosely हृदयn . [IN CONTEMPT, ANGER, &c. उराड n, छाताड n. HoLLOW OF THE B. उराची शिंप f. PIGEON B., PROJECTING B. उराड n. TO CLASP TO TIE B. उराशी-पोटाशी-&c. धरणे, पोटाळणे.] २ (of a woman-&c.) स्तन , थान , कुच m, छाती , जोबन , मामू m, मिमीf, उरोज m, पयोधर m; as, " My brother that sucked the B. of my mother." [IN COVERT, वरशी OR वरलाशी n.pl. A HARD B. दगडी छाती f. MOTHER's B. अमा-आमा m, मामn , अमू m. To SUCK THE B. स्तनपान n. करणे.] ३ heart, conscience, mind हृदय n. हृदयमंदिर (idio.)n, हृदयकमल (idio.) n, अंतःकरण n(a loyal B.), colloq. पोटn , मन n. [WEIGHT UPON ONE'S B. उरावरचा गोहो-दगड-दडपण-धोंडn. To MAKE A CLEAN B. (OF A THING ) चोरून न ठेवतां सांगणे, मन मोकळं करून सांगणे.] ४ कोणत्याहि वस्तूचा दर्शनी भाग, छातीf; as, The B. of a hill. ५ भट्टीचा दर्शनी भाग m, छाती. B. V. t. छाती ठोकून पुढे उभे राहणे, सामना देणे; as, To B. the storm. Breast-bone n. उराचे हाडn, उरोस्थि n. Breast-deep, Breast-high a. छातीइतका उंच, छातीभर. Breasted a. छाती असलेला. Breast-knot n. छातीवर लावण्याची फितेची धनुकली f. Breast-pin n. छातीवर लावण्याचा टांचणीसारखा दागिना m. Breast-plate n. छातीचे कवच n, चपरास f, उरस्त्राण n. Breast-plough n. छातीइतकाच उंच नांगर m. Breast-rail n. छातीइतकी उंच रेल, (संरक्षणाकरितां) छातीइतक्या उंच बांधलेल्या भिंतीवरची रेल f. Breast-summer, Bressummer n. आधारकाठी f, आधारबहाल, ह्यावर छपराचा सर्व भार असतो. [खिडकीवर दरवाजावर बसविलेली जाडी फळी (छावणी) ज्याप्रमाणे वरचा सर्व भाग तोलते त्याप्रमाणे हे आधारबद्दल छपराचा सर्व भाग तोलतें.] Breast-wall n. छातीइतकी भिंतf.