पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/474

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

comp.) भेद m, (in comp.) उलंघन n. ३ rupture amongfriends फूटf, तूट.f, भेद m, बिघाड m, अंतर n. as, The B. of two brothers. [To heal a B. डांगपट्टि f, घालणे, भांडण मिटविणे.] ४ भंग m; as, B. of promise, Breach of law. .५ surg. जखमf.६ तुटून पडणेंn, हल्ला m, झपाटा (given in the Marathi. Bible); as, " The Lord has made a B. upon Uzza." ७ med. उतरणें , स्त्रंसन, भ्रंश, सरकणे, (आंत. वैगरे भागाचे अंतर्गळ) (not अंग बाहेर येणे). ८ (जहाजावर समुद्राची) लाट आदळणे n- फुटणें , लाटेचे पाणी n, मोठी लाट f. A clear breach जहाजावरून लाटा सपशेल निघून जाणे. A clean breach जहाजावरच्या सर्वांस लाटांनी उडवून नेणे. Breach v.t. to make a breacle खिंड f, पाडणे; as, To B. the walls of a city. २.fig. भंग करणे. To commit a breach of the peace सार्वजनिक शांततेचा भंग करणे.. B. v. i. दुभागणे. Breach y a. मोडण्याजोगा, फोडण्याजोगा. N. B.—To heal a breach as given by Mr. Candy is a faulty or incongruous metaphor. We heal & wound but not a breach. Bread (bred ) [ A. S. breod, BREAD.] [साहेव लोक भाकरीच्या पिठांत आंबवण घालतात, व ते ती भट्टीत भाजतात. हिंदु लोक भाकरीच्या पिठांत आंबवण घालीत नाहीत व ते ती तव्यावर भाजतात. BREAD = भाकर. व CAKE पोळी असे अर्थ एक दांचे ठरवून टाकावे. CAKE शब्दाची माहिती पुढे दिली आहे. रोट, रोटगा, पानगा, भाजणीची भाकर, चपाती इत्यादि भाकरी च्या प्रकारांसंबंधाने पूर्ण माहिती कोशांत देणे अशक्य आहे.]n. (जोंधळ्याची-तांदुळांची बाजरीची-&c.) भाकरf, गव्हांची चपाती f. [B. IN COVERT OR JOCOSE PARASEOLOGY भकारीf, भास्करीf, सूर्यकन्याf.] २ (compreh.) अन्न n, अन्नपाणीn, दाणापाणी n. ३ means of subsistence (as in the phrase 'daily bread') अनवस्त्र n, निर्वाहास लागणाऱ्या अवश्य वस्तु f. pl, चरितार्थ m-उपजीविका f,निर्वाहाचे साधन n; as, "The B. of a family depends on that man's paralytic hand." Bread and water अन्नपाणीn, अन्नोदक n. that has eaten the bread (salt) of (*) अन्नाचा, To beg for one's bread (*) (to beg one's bread) अन्नाकरितां भीक मागणे, असा करीत फिरणे. To begin to get (earn) one's bread आपले अन्नवस्त्र मिळवू लागणे, आपल्या श्रमाने पोट भरूं लागणे. To be reduced to bread and water केवळ अन्नोदकावर राहण्याची स्थिति येणे, चणवणी-मिठवणी पिऊन असणे. To destroy or injure one's bread (*) (to deprive one of his bread, to stand in the way of one's bread) पोटावर पाय देणे, पोटावर उठणे-येणे, पोटाआड-अन्नाआड येणे, पोटावर मारणे, अन्नांत माती. घालणे कालवणे, idio. To lose one's bread अन जाणे g of o. To put in the way of earning one's B.अन्नास लावणे . To quarrel with one's B. and butiter पढे वाढलेल्या पानास लाथf. मारणे, आपल्या अशांत माती पाडून घेणे. To take the B. out of one's