पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चुकी f, भूलf, घोडचूक, ढोबळ चूक f, प्रमाद m. २ (in writing or speaking) अवाक्षर m, अशुद्ध m, असंबद्ध n. Blunderer n. Blunder-head, Blunder-headed a. चुकणारा, भकणारा, धांदल्या, गोंधळ्या. Blunder'ing p. a. (v. V.) one given to blundering चुकणारा, अकणारा, चुकरा, गफलती or त्या, अशुद्वाळ, आंब्या, मावळ or ळ्या, झांबच्या, धांदल्या, गोंधळ्या. २ ढोबळ चुका करणारा, अडखळणारा. To blunder away एखादी संधी जाऊ देणें, घरी चालत आलेल्या लक्ष्मीला लाथ मारणें. To blunder on चुका करीत असणें. .२ (एखाद्या वेडगळ मार्गानें किंवा चुकतचुकत) आकस्मिक जाऊन पोहोचणे; as, To B. on a discovery. Blunder'ingly adv. चुकत चुकत, चुकतमाकत, चुकतबाकत, चुकत मुकत, घसरत घसरत, प्रमादानें.
Blunderbuss (blun'der-bus ) [Dut. donderbus ; Ger. donner reechse, a thunder-gun.] n. 'बंदरबस,' दमामा m, बकमाल f. २ मोठ्या तोंडाची लहान बंदक f. (पुष्कळ गोळ्यांची.) ३ मूर्ख, टोणपा.
Blant (blunt ) [Sw. blott, naked; M. E. blunt, blont, dull.] a not sharp बोथा, बोथट, बुठणा, बोटका, पु or बोठा, नरम, मऊ, मुंढा, अतीक्ष्ण, अतीव्र, जड, बोधे, ठोसर, मोठा, लोणकाप्या, धार बसलेला, बाथलेला, &c. [TO BECOME B. बोधणे, बोथटणे, माठणे, बुटणे OR वाठणे, चोळणे, बसणे, बोधणे.] २ dall मंद, जड, बोथट, अतीक्ष्ण, अतीव्र. ३ roughly plain, open and free-spoken निखालस, धोपटमाा , धोपटमार्गी, कडकडीत, खडखडीत, खडखडीत स्वभावाचा, खरमरीत, खसखसीत, ख. णखणीत, ठसठसीत, सणसणीत, झणझणीत, धडकफडक or धडकभडक, खरपूस, निर्भीड..B. v. t. बोथवणें, बोळवणें, बसवणें, धार f. मोडणें-बुझविणें g. of a.; धार f पाणी -उतरणें g.of. o., निपाणी करणें. २ fig. (the feelings or faculties) तीक्ष्णता f-तिीवता f-प्रखरता f. &c. घालविणें कमी करणें. Blunt'ish a. मंदसर. Bluntishness n. Blunt'ly adv. (v. A. 1.) बोरे पणाने. २ मंदाईनें, जडपणानें. ३ plainly, roundly, downright, outright, plump, smack, flat, slap gs. घडीत, निक्षून, निखालस, हडसूनखडसून, रोखठोक, रोख. ४ चरचरीत, खसखसीत, धडकफडक, धडक. भडक, धादांत, साफ, खरपूस. Blunt'ness n. (v. A. 1.) बोधेपणा m, &c., मंदाई f, मंदत्व n, सऊपणा m, नरमाई f, अतीक्ष्णता f, अतीव्रता f. Blunt-file n. दाते बसलेली कानस. Blunt-witted a. मंदबुद्धीचा, मट्ट डोक्याचा, मृत्पिडबुद्धि.
Blur (blur) [Swed. blura, to blink; lit. 'to dim.']n. (पुसटलेल्याचा) डाग m. २ कलंक m, दोष m, व्यंग. B. ७. t. अस्पष्ट-पुसकट करणें, (दृष्टि) अंधुक करणें, दिपवणें, डोळ्यांवर सापड आणणें; as, "Her eyes are. blurred with the lightning's glare." २ कलंक लावणें, व्यंग काढणें, दोष लावणें (with out and over). ३ lit & fig. डाग पाडणें, बिघडवणें, घाणेरडा करणें. Blurring pr.p. Blurred p. p. Blurry a.