पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व धड वाईट नाही). Between Scylla and Charybdis इकडे आड व तिकडे विहिर. Between two fires दोन संकटांमध्ये. Between two stools you come to the ground दोन दगडांवर हात ठेवला तर तुह्मी जमिनीवर पडाल. of. Marathi idiom दोन दगडांवर हात ठेवू नये. To go between मध्यस्थी करणे. A go-between मध्यस्थ, भडवा (slang). Between is rarely used as a noun and then it means मधला काळ किंवा स्थळ. N. B.-The idioms 'Far between,Few and far between' and 'Short and far between' will be found under Far. Betwixt (be-twikst' ) [ A. S. be, by & twa, two.] prep. दोन वस्तूंमधल्या जागेत; as, " From betwixt two aged oaks.” २ एकापासून दुसऱ्याकडे. Bevel ( bev'el) (Fr. biveau, an instrument for measuring angles. Origin uncertain.] n. विषमकोन n, काटकोनापेक्षा लहान किंवा मोठा कोन m. २ दोन पातळीमधील कोन m. ३ (एखाद्या पृष्ठभागाच्या कडेची) उतरण f. To give a bevel to the edge of a table टेबलाला उतरती कडा काढणे. ४ carpentry चळता काटकोन (न्या) m, चळता गुण्या m ह्यालाच bevel square असेंही म्हणतात . सुतारकाम करीत असतांना फळी कोनदार कापावयाची असली तर ह्या चळत्या काटकोन्याने कोन आखून घेतात व मग त्याप्रमाणे ती फळी कापतात. ५ casting and foundery कोडी. B. a. कोनेदार, कोनदार, तिरकस, चळत्या काटकोन्यासारखा. २ (poe.) नीतिभ्रष्ट. B. v. i. काटकोनांत नसणे, झुकता असणे; as, Their houses are very ill built, the walls bevel. B. v. t. (चळत्या काटकोन्याने आंखून) तिरकस कापणे. २ कडेचा उतार (स्लोप) काढणे, उतरती धार पाडणें. Beveled or Bevelled Pa. t. & Beveling or Bevelling pa. p. Bevelgear n. दोन तिरकस-तिर्यक् दांत्यांच्या चक्रांची रचना f. या रचनेने एका आंसाची गति दुसऱ्या आंसाला देता येते. Bevel wheels तिरकस-तिर्यक् दात्यांची चक्रे m, तिरकस कोपर्यांची चाकें n. Bevelled edge उताराची-तिरकस-उतरती धार f. Bevel pinion mech. eng. मोठ्या चाकाच्या दात्यांत फिरणारे लहान उतरत्या दात्यांचे चक्र n. Bevelling machine n. (पुस्तकांचे पुठ) तिरकस कापण्याचे यंत्र. Bever (bēv'er) [It. bevere, to drink.-L. bibere, Sk. पिब , to drink. It seems that this repast originally consisted of a drink.] n. (obs.) मधल्या वेळचा फराळ m. B. v. i. (obs.) मधल्या वेळी फराळ करणे. Beverage (bev'er-āj) [O. Fr. bevrage, beivre.---L. bibere, Sk. पिब् , to drink.] n. मादक पेय n, मादक n; as, An intoxicating B. पुष्कळ वापरांत असलेल्या दारूला पूर्वी हा शब्द लावीत असत. २ पेय n; as, Tea, that elegant and popular B. ३ .लि.आपल्या वर्तणुकीचा कडू परिणाम m. ४ (slang) पेय किंवा पेयाकरितां पैसे. एखाद्याने पहिल्यानेच नवीन