पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Betray ( bē-trā') [A. 8. be & Old Fr. trahir.-L. tradere, to deliver up.] v. t. विश्वासघात करणें. २ (दग्यानें-विश्वासघातानें) स्वाधीन करणें-सोपणें-देणें; as, To B. one to his enemies, विश्वासघात करणें, विश्वासानें गळा m. कापणें. ३ गळा कापणें fig. ४ to disclose (a secret) (दग्यानें) मंग्रभेद-गुप्तभेद करणें, बाहेर फोपुणें ; as, To B. a secret. ५ प्रगट करणें, बिनसावध गिरीने उघड करणें; as, To B. ignorance. ६ आडमार्गास नेणें, पापाच्या मार्गास नेणें ; us, To B. a virgin. ७ स्पष्ट करणें, स्पष्ट रीतीने दाखवणें, colloq. ठणठण बोंब मारून सांगत सुटणें; as, "All the names in the city B. great antiquity." Bryant. ८ भलत्याच मार्गास नेणें, नुकसानीत उतरणें; as, "This conduct of his betrayed him into great troubles." Betray'al १. विश्वासघात करणें n, फसविणें n, दग्यानें बाहेर फोडणें n. Betray'er n. विश्वास घात करणारा, दगेखोर मनुष्य. २ बेसावधपणामुळे गुप्त स्फोट करणारा. ३ (भोळसर मुलीला) घरांतून फूस लावून बाहेर काढणारा-पळविणारा, आडमार्गात नेणारा.
Betrim (bc-trimi')v.t. व्यवस्थित करणें, टापटिपीत ठेवणें, सुशोभित करणें, (दिव्याची वात वगैरे) कापून बरोबर करणें. Betrimmed pa. t. & p. p. Betrimming pr.p.
Betrodden (be-trod'n) pa.t. & pa. p. of Betread.
Betroth (be-troth') [Pref. be & Troth or Truth. Betroth शब्दाचा मूळ अर्थ वचन देणें (to give one's word, to pledge one's self to any cause) असा आहे.] V. t. to engage or promise with a view to marriage (वधू अमुक वराला दिली असें) वाणीने ठरविणें, वाग्दान n-वाइनिश्चय, (pop.) वाग्निश्चय m- वाझनियम करणें with g. of 0., वाचादत्त-वाग्विवाहित करणें. २ to promise to take as a future spouise (R.) वाणीने वरणें, वाक्प्रतिग्रह-वाकस्वीकार करणें with g. of o. ३ वाचेने विशपाची अमुक एक देवळावर नेमणूक करणें. Betroth'. al, Betroth'ment n. (v. V. T.)-act. वाग्दान करणें , वाग्दान , वाचादान .-act. वाणीने वरणे.(R.), वाकस्वीकार /R.) m. Betrothed' a. (v. V. T.)वाग्दत्त. वाचा. कस लीची (used of a female ), प्रतिजाति, हित. वाग्विवाहित. २ वाणीने वरलेला, वाकस्वीकृत. The word Betroth is used more usually with reference to females. We say a female is be. trothed and very rarely a male.
Better ( bet'er) [ A.S. bettera ; Dut. beter, better. nmore.] adv. (comp. of Well) अधिक बया किंवा चांगल्या रीतीनें, जास्त अकलेनें-शहाणपणानें, जास्त फायदेशीर रीतीनें-कुशलतेनें यश येईल अशा रीतीनें. २ जास्त बिनचूक किंवा पूर्ण रीतीनें.as, You must do your homeWork better. ३ जास्त प्रमाणानें, जास्त अंशांनी, (किंमत, वेल, अंतर ह्या बाबतींत) जास्त प्रमाणानें. B. a. (comp. of Good) अधिक उंच-सरस-बरा. Betters n. वडील,