पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

women.)२ भडवा m. B.v.i. व्यभिचाराकडे स्त्रियांचे मन वळविणे. २ व्यभिचाराकरितां बायका मिळविणे. Bawd'ry 3. कुंटणपणा m, कुंटणगिरी f, दूतीकर्म n, कुंटणकी f. २ बीभत्स भाषण n, अचकट विचकट or विचकट बोलणे . ३ व्यभिचार m. Bawdya. बीभत्स, अचकट विचकट, अर्वाच्य. Bawdiness n. Bawd'y-house n. a brothel, a Baguio, a stew कुंटणखाना m, छिनालखाना m, रांडवाडा m, वेश्यागृह n. Bawdily adv.
Bawd-rick (bawdrik) n. पट्टा m.
Bawl ( bavl) [L. baulare, to bark like a dog.] v. i. (from pain) to bellow, roar ओरडणें, अ(आ)ओरडणें, बोंबलणें, आकांतणें (poe.), आक्रंदणें, ओक्साबोक्सी रडणें, घसा m-टाहो m-फोडणे-फोडून ओरडणें, आकांत m-आक्रोश m-आक्रंदन n-अ(आ)रड or ओरड f-अरडाओरड f-&c. करणे. २ to cry out, vociferate गागणें, आरडणें or ओरडणें, पुकारणें, गरजणें, ओरड f- ओरडा m- अरडाओरड f- पुकारा m- ललकारी f- or ललकारणी f- कल्लोल m- कोल्हाळ m गोंगाट m-&c. करणे, अ(आ)रोळी f. मारणे. ३to speak loudly घाटी f. खाऊन-गळा m. फोड़न-तंगाडून-गळा काढून-शिरा f.pl. ताणून &c. बोलणें, कडकून बोलणें,जीव टाकून ओढून-खाऊन-देऊन तोडून-खरडून-&c. बोलणे, मोठ्या गळ्याने बोलणें, गळेफोड f. करणे. ४ to bellow at, roar at दणकावणें, खणकावणें, दणगारणें, दुरकणे, कडकडणें, ताव m. देणे,खाकरवसा m घालणे. B.u.t. पुकारणें, आरोळी मारणे, २ ओरडून जाहीर करणे. B. n. आरोळी f. ललकारी f आक्रोश m. Bawl'er n. ओरडणारा, बोंबलणारा, &c., बोंबठोक्या, अरड्या or ओरड्या, बोंबल्या, बोंबसाऱ्या. Bawling p. a. (v. V.) Bawling n. (See Bawler.) ओरडणे , बोंबलणें n. &c., आकांतm, आक्रोश m. &c. २ गागणे (?) n, ओरडणे n, पुकारणे n. &c., ओरडा f, पुकारा m, ललकारी f. &c.
 N. B.--गागणें या शब्दांत रागा( anger)ची झांक आहे; ती इंग्रजी Bawl शब्दांत नाही. ललकारी हा शब्द विशेष प्रकारच्या ओरडण्याला लावतात; जसें, भालदाराची-चोपदाराची ललकारी.
Bay (bā) [ L. baia, a harbour. ] n. उपसागर m, कोळ n, वांकण 2. [B. (large) आखात n, मोठा उपसागर m.] २(उपसागरासारखा) घराचा पुढे आलेला भाग m, उपगृह . ३ एखाद्या इमारतीचा खणासारखा भाग m, खांबांनी किंवा इतर कोणत्याहि कारणांनी झालेला भिंतीचा किंवा छपराचा खण m. ४ (वाळलेले गवत किंवा धान्य ठेवण्याकरितां) कोठारांतला खण m. ५ बे नांवाचें लाकूड n. Bay-salt n. समुद्राचे मीठ n.
Bay (ba) [ L. bacca, in. berry. ] n. विद्युत्प्रतिबंधक झाड n. वीज आंगावर पडूं नये ह्मणून या झाडाच्या पानांची माळ गळ्यांत घालीत असत. २.fig.pl. विद्वत्तेची कीर्ति f. ३ जयचिन्ह n; as, Crowned, with buys जयचिन्हांकित, विजयमाळा ज्याच्या आंगावर आहे असा; जयचिन्ह ह्मणून या झाडाच्या पालवीचे तुरे लावण्याची युरोपांत पूर्वी चाल होती. ३ तज, दालचिनी. The bark of B. दालचिनीत्वक् f, दालचिनीची पत्री f. Bay-leaf n. विद्युत्प्रतिकारक झाडाचे पान n.