पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Baste (bāst) [Fr. bastir, to sew.] u. t. धावदोरा घालणे. (पक्की शिलई करण्यापूर्वी असा दोरा घालतात.) धागे मारणे, टांचे मारणे, टांचणे. Basting n. धावदोऱ्याची शिवण f.
Bastille, Bastille ( bast-el') n. पारीसमधला एक जुना किल्ला m [याचा सरकारी तुरुंग ह्मणून उपयोग करीत असत. हा इ० स० १७८९ त फ्रान्सांतील बंडवाल्या लोकांनी पाडून टाकिला], तुरुंग m. २ a tower or bastion of a castle तटबंदी बुरुज m. ३ a small fortress किल्ला m.
Bastinado (bast-in-ād'o) (Fr. bastonnade, baston, a stick or staff.] n. मारझोड f, वांसेमार m, टोणपेमार m, दांडकेमार m, दंडप्रहार m, यथास्थित सोंटेमार. २ काठीने पायाच्या तळव्यावर मारणे (तुर्क, चिनी वगैरे लोकांची एक शिक्षेची पद्धत). B. V. t. सोंठ्याने मारणें, दांडकणे, सोटाळणे, मारझोड.f. करणे g. of o., चेचरणें, चंचणे. २ (शिक्षेदाखल) पायाच्या तळव्यावर मार देणे. Bastinade' n.
Bastion (bast'yun) [Fr. batir, for bestir, to build.] m. fort बुरूज m, हुडा m. [FORTRESS OF FOUR BASTIONS चौबुरजी]. Bast'ionary a. बुरुजांचा. Bast'ioned a. बुरूज असलेला. >br> But ( bat ) [A. S. batt, ef. bat, a staff.] 1. (मुठीची). दांडफळी, बॅट.f, क्रिकेट खेळण्याची फळी f, दांडू m. २ दांडकें (*) n. सोंटा (*) m, दांडू M, दांडूक ?. ३ (short for batter or batsman) बॅटने खेळणारा; as, He is a good B. ४ विटेचा निमुळता तुकडा m. ५ रजईत किंवा इतर कपड्यांत भरण्याकरितां केलेली कापसाची लेपडी f. ६ mining अतिशय पातळ थराच्या रूपांत असणारी एक प्रकारची कुंभारमाती f. Parliament of Bats सोटेवाले पार्लमेन्ट. B. u. t. (बॅटीने) मारणें-हाणणे. B. u. i. cricket चेंडूफळी घेऊन खेळणे. To carry out the B. चेंडूफळीचा खेळ संपेपर्यंत बाद न होणे, शेवटपर्यंत टिकणें-राहणे. Off his own B. त्याच्या एकट्याच्या श्रमानें, त्याने स्वतः. Bat-horses स्वारीमध्ये लष्करी अधिकान्यांचे सामान वाहणारे घोडे. Buts'man, Bal'ter n. बॅटने खेळणारा, क्रिकेटमध्ये दांडफळीने खेळणारा, बॅटवाला. Butting n. cricket दांडफळीने खेळणे n. २ दांडू (बॅट) वापरण्याची ढबपद्धत-शैली f.
 N. B.-दांडके, सोंटा, दांडू आणि दांडूक ह्या चारी शब्दांत वाटोळेपणाची कल्पना आहे ; व इंग्रजी Bat शब्दांत सर्वभर किंवा काही भागांत तरी चपटा असणे अशी कल्पना आहे. तेव्हां वरील चारी शब्द Bat ला बिनचूक प्रतिशब्द होत नाहीत.
Bat ( bat ) n. वाघूळ n. [WILD B. वडवाघूळ n.] Batty a. वडवाघुळाचा. २ वडवाघुळासारखा. Bat-fowling n. रात्री विसावा घेत असणाऱ्या पक्ष्यांची पारध f.
Bitarian ( ha-ta'vi-an) a. प्राचीन बटेव्ही जातीसंबंधी. (या जातीने हॉलंड देश वसविला. बटेव्हिया हैं हॉलंडचें पूर्वी नांव असे.) २ जावामधील बटेव्हिया राजधानीसंबंधी. B. n. तुच मनुष्य किंवा बटेव्हियांतला मनुष्य m. Batch (bach) [From A. S. bacan, to bake, connected