पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिशब्द देण्यांत कांही हांशील नाही. Bashful शब्दांत मुख्यतः विनयातिरेका (excess of modesty,) ची कल्पना आहे, तो भीड किंवा संकोच किंवा सभाभीति ह्या तिन्ही शब्दांत नाही.
 आपला मराठी शब्द लज्जा (लाज) हा इंग्रजी modesty किंवा shame ह्या शब्दांनी व्यक्त होतो हेहि ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे.
 ज्याप्रमाणे खोर ह्या अंत्य प्रत्ययाचे हरामखोर, दिवाळखोर असे शब्द सध्या मराठीत आहेत, त्याप्रमाणे लज्जाखोर हा शब्द आज भाषेत चालू नाही व तसा नवीन तयार करण्याची जरूरही दिसत नाही.
Basidiam (ba-sid'i-um) | Gr. basis, a base, sides, likeness. ] n. bot. the cells of the fructiflcation in some fungi, which form the 'gills' and learn the spores. अळंब्यांतील रेणुजनक पिंड n. pl. Basidia.
Basil ( baz'il) [Fr. basilic, It. basilica, the basil from Gr. basilicas, royal perhaps because the herb was used in some royal unguent, bath or medicine.] n. तुळशीच्या जातीची वनस्पति f. [HOLY BASIL OR BLACK BASIL (Ocymum Sanctum) काळी तुळस, वैजयंती, कृष्णतुळस OR तुलसी. WHITE BASIL (Ocymum gratessimum) पांढरी तुळस, रामदूती OR रानतुळस. THIS रानतुळस IS ALSO CALLED मालीतुळस. BUT माली IS A SYNONYE FOR पाच IN कोंकण PARTICULAR UP IN THE सावतवाडी DISTRICT. पाच IS REALLY SPEAKING Pogosterion Patch ONLY. WHAT IS KNOWN AS WILD BASIE (Calamintha compendium) IN ENGLISH BOTANY IS NOT FOUND IN INDIA.]
Basilian (ba-zill,i-an ) a. लेन्ट लेसिल साधूच्या पंथाचा, (हा पंथ एशियामायनरामधील कॅपेडोशियामध्ये खिस्ती शकाच्या चवथ्या हातकांत स्थापण्यांत आला). B. n. सेन्ट बेसिल पंथाचा साधू m.
Basilicon ( bez-il'ik-on) [Gr. basilikon, royal.] N. लपराज, एक जातीचे मलम n लेप M. हा पिवळे मेण, राळ, व डुकराची चरबी ह्यांपासून करितात. also Basilicum.
Basiliek ( baz'il-isk) [ Gr. basileus, a king. ) n. एक जातीचा विषारी सर्प m, सर्पराज m. इतर जातींचे सर्पहि यापासून दूर पळतात व ह्याची ज्याच्यावर नजर पडते तो मरतो अशी समजूत आहे.
Basin ( bas'n ) [Supposed to be from L. I. a water vessel, dim. of bas. a wide open vessel.] n. तसराले , फार रुंद तस्त n, काथोटली f, फार रुंद वाडगा m, रुंदीच्या मानानं अतिशय थोड्या उंचीचें आंडे n.२ हौद m, कुंड n. ३ अळे n. ४ a hollow between two hills पाळे n, औंडण f. or n, ओंडवण n, घोळ f. ५ तसराळंभर, तस्तभर. ६ थडी; as, in गंगाथडी. ७ नदीचा पाणवठा, ज्या प्रदेशांतून एखादी नदी किंवा तिला मिळणाऱ्या नद्या वाहतात तो प्रदेश m. ८ dock नदीच्या किंवा समुद्राच्या कांठची गोदी Coal basin कोळशाचे थराचा प्रदेश.
Basinet (bas'i-net ) Same as bassinet.
Basis (bās'is) [L. and Gr. basis, the foundation.] n. पाया m, तळ m, बैदकी f, बूड n, आधार m, अधिकरण n, मूल n (*), मुलतत्त्र n (*), मूळचा-सुरवातीचा पाया