पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दार m, सनदी सरदार m-उमराव m.] २ ब्रिटनमध्ये कोणताहि सनदी हक्क नसलेला परदेशी उमराव; as, Baron Rothschild. ३ एक्सचेकरच्या कोडतांमधील न्यायाधीश m. ४ heraldry नवरा m. Bar'onage n. बॅरनमंडळी, कनिष्ठ सरदारांचा वर्ग m. Bar'oness n. सरदाराची बायको f, सरदाराचे हक असलेली स्त्री f. Bar'ony n. सरदाराची-उमरावाची पदवी f-अधिकार m-जहागीर f-प्रांत m.
 N. B.-जसे इंग्रजीत रावसाहेब, रावबहादूर, खानसाहेव, खानबहादूर, श्रीमंत, इनामदार, जहागिरदार इत्यादि पदवीदर्शक शब्द कायम ठेविले आहेत तसेच आपण मराठीत बॅरत, बॅरोनेट ड्युक, अर्ल, नाईट हे शब्द कायम ठेवावे.
Baronet (bar on-et) n. बॅरनच्या खालच्या प्रतीचा उमराव m, (Knight) नाइटपेक्षा (Baronet) बॅरोनेट हा श्रेष्ठ आहे व बॅरोनेटपेक्षा बॅरन हा श्रेष्ठ आहे. बॅरोनेट ही पदवी वंशपरंपरागत असते, व ही पहिल्या जेम्स राजाने इ. १६११ त निर्माण केली. Bar'onetage n. बॅरोनेट मंडळी, बॅरोनेटाचा दर्जा m, बॅरोनेटाची पदवी f, बॅरोनेटाचे पद n. Baronetcy n. बॅरोनेटाचा अधिकार m-पदवी f, बॅरोनेटाची सनद f. Baronet'ical a.
 N. B.--इंग्लंडांतील निरनिराळ्या उमरावांच्या अधिकाराची व योग्यतेची विस्तृत माहिती आम्ही Lord शब्दाखाली देणार आहों. Baroscope (bar'o-skop) [ Gr. barros, Sk. भार, weight, & skopein, to see.] n. phys. (हवेचें) भारदर्शक n. Baroscop'ic-al a. भारदर्शकासंबंधी, भारदर्शकानें दाखविलेला.
Barouche (ba-r'õūsh') [Ger. barutsche; L. bis, Sk. द्वी:, double, and rota, a wheel. ) n. पडत्या झांकणाची चौचाकी गाडी f. ह्या गाडीचे झांकण पाडतां येतें, हिच्यांत चार मनुष्ये बसतात व हांकणारा बसण्याची जागा निराळी असते, बारुश.
 N. B.-- लॅटिन rota, आणि संस्कृत 'रथ' ह्यांचा व्युत्पत्त्युगम एकच असावा असे वाटते.
Barque, Bark (bārk) [ Bark is the English spelling of Fr. Barque, a little ship. Late L. barca, a sort of ship or large boat. ] n. लहान जहाज n, गलबत n, बारकस n. सध्या हा शब्द जहाज ह्या सामान्य अर्थी वापरतात. Barquentine, Barkantine n. तीन डोलकाव्यांचे एक प्रकारचें गलबत n.
Barrack (bar'ak) [Fr. baraque, It. baracca, Sp. barraca, a soldier's tent. ] (gener, used in the pl. rarely in the singular:) n. mil. लष्करी शिपायांची चाळ f, 'बॅरक,' अलंग f. २ a temporary hut or cabin थोडे दिवस राहण्याकरितां बांधलेले घर n. ३ एकाच वर्गाच्या मजूरदार लोकांची चाळf.; as, The barracks of mill-hands. B. v. i. चाळीत राहणे. B. V. t. लष्करी शिपाई राहण्याकरितां चाळ बांधणे. २ बराकीत ठेवणे. B.-master n. बराकीवर देखरेख करणारा कामगार m, बराकमास्तर m.
Barracoon ( bar'a-koon ) n. a depot for glares गुलामांचे संग्रह-क्रयविक्रय-स्थान n.