पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

banir. bunair, to proscribe.] u. i. repatriate, exile हद्दपार-देश-मुलुख पार करणें, देशनिकाला-देशपारखा देशहद करणें, देशपार-राज्यपार-तरपार करणें, देशांतरासदीपांतरास-&c. घालवून देणें. २. fig. drive away घालवून देणें, दूर करणें, दवडणें, घालविणे; as, To B. cares, anxieties, ideas and thoughts from one's mind. Banished p. (v. V. 1.) हद्दपार केलेला, देशपार केलेला, देशनिकाला [R], देशपारखा, मुलुखपारवा, देशबहिष्कृत, हाकुन दिलेला. Banishment १. (v. V. 1.)- देशपार करणें n, देशबहिष्कार m, निर्वासन n.-state. हद्दपारी देशनिकाली f, देशबहिस्कृति f.
Banister ( ban ister ) n. Theme as Baluster.
Banjo (Banjo) n. सतारीसारखं पांच तारांचे एकवाद्य n.
Bank (bangk ) [A. S. bank, a bench.] n. तट m, कड f, तीर m, किनारा m, त(थ)ड, f, तटाक m. २ बांधारा m, बांध m, बंधारा m. [ Farther or other B. पैलथड f, पैलथडी f, पैलतीर n, परतीर n, पैलथड, परपार m, पैलपार m, पैलतड f. Hither or near B. ऐलथड f, ऐलथडी f, ऐलतीर n. Hither and further banks पारावार (?) m. On both banks दुथडी.] २ high or steep bank डगर f, दरड f, धस m, धसरड f. [ FULL OF BANKS OR RIDGES दरडवट.] ३ dike, mounded, mole बांध m, बांधोळी f, वंधारा n, पेंडवळ [R.] m, पेंडवळा [R.] m. [LITTLE B. TO STOP WATER ताल F, पाळ f. ] ४ shelf, shallow, flat भाट n, भाटी f, लाग m. ६ खाणीत काम करणारे लोक जेथें खपतात ती सपाटी f. B. v. t. confine with banks बांधणे, बांधारण, बांध M. घालणे. २ ढीग किंवा रास करणं. Bandsman n. खाणीच्या तोंडाशी देखरेख करणारा. From bank to bank कोळशाच्या खाणींत उतरणारा मनुष्य वरून खाली जाऊन वर येईपर्यंतचा काल m. Banker एक जातीचा पडाव ४. २ नाला खणणारा. ३ गवंडी लोक ज्या दगडी बांकावर दगड घडतात ते बांक. Bank side नदीची उतरती कड . Bank-sided a. आंत उतरत्या बाजूचे (जहाज; opposed to wall-sided). To B. a fire, to B. up a fire (विस्तव पुष्कळ वेळ राखण्याकरितां चुलीतील) राख निखान्याघर घालणे.
N. B.-Bank तट. इंग्रजी Bank शब्दांत उंचपणाची कल्पना प्रधान आहे; तीच मराठी तट शब्दांत आहे. Coast हा विशेषतः भुगोलांतील पारिभापिक शब्द आहे. 'जमिनीचा शेवट' हा माना प्रधान अर्थ आहे; तर Coast शब्दाला किनारा हा शब्द योग्य होईल. Shore समुद्रकिनारा. A shore is a strip of land washed by the sea.
Bank ( bangk) n. वल्हीं मारण्याकरितां बसावयाची उंच जागा f, उंच बैठक f, बांक n. २ a rank of our's one above another एकावर एक बांधलेली वल्ह्यांची उभी ओळ f ३ law न्यायाधिशाची बैठक f, कायद्याची तक्रार ऐकण्याकरितां भरलेलें कोर्ट कचेरी. ४ print छापलेले किंवा छापण्याचे कागद वगैरे ठेवण्याचे उतरतें मेज n. ५ mms. तंतुवाद्याच्या चाव्या.f.pl.
Bank (bangk) [Fr. banqua, a bench or table.] n.