पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समानार्थी शब्द आहेत. ह्यांचा इंग्रजीतील भेदभाव लक्ष्यांत आणून त्यांना खालील प्रतिशब्द योजिले आहेत. Bad, वाईट; evil, अनर्थकारक; wicked, दुष्ट; naughty, द्वाड, दुवृत्त.
 We are on bad terms with each other, त्याचे व आमचे वैमनस्य आहे, त्याचा व आमचा वेदनाव आहे.
इंग्रजी Bad taste ह्या शब्दांत "खुबी, मजा, नर्म अगर लोकरूहि न समजणे" असा अर्थ आहे.
Bad, Bade (bad) Bid धातूचा भूतकाळ. हकूम केला.
 Fide Bid.
Badge (baj) [L. L bagia, sign, bageo, connected by Skeat with LL. baga, a ring.] n बिल्ला m, खूण f, चिन्ह n, निशाणी f, लक्षण n, बिरीद or बिरुद n (of a man), कंकण ('), चंग (') m. B. u. t. खूण करणे. Budge man निशाणी वाळगणारा. २ अन्नछत्रांत रहाणारा, भिक्षेवर रहाणारा.
 N. B.-Badge-व्यक्तीची खूग, व्यक्तिसंज्ञान, व्यक्तिकेतन. Cognizance-कुळाची खूण, कुळसंशान, कुळकेतन. कंकण is the Budge of fresh marriage among the Hindus.
 एखादं काम करण्यापूर्वी किंवा ते काम करीत असतांना कंकण हातात बांधतात. एखादे काम करण्याकरिता त्याने पायांत चंग बांधिला आहे ह्मणजे तें काम करण्याकरिता त्याने विडा उचलला आहे, तसेच निशाणी हा शब्द दुसऱ्या वस्तबद्दलची खुण हा अर्थ वापरतात; जसें, सही करता येत नसली झणजे तिच्याबद्दल त्या ननुष्याला काही तरी निशाणी करावयास सांगतात. बिल्ला हाच Badge शब्दाला योग्य प्रतिशब्द आहे.
Badger (baj'er) [Fr. Wulier, & corn-dealer iu allusion to some of the habits of the animal, called Badger. ] n. एके ठिकाणी धान्य घेऊन दुसरे ठिकाणी विकणारा.
Badger ( bajer) [अनिश्चित व्यत्पत्ति. According to Dr. Murray from badge and ard, on account of the white mark on its forehead.] u. t. to pester' हाल हाल करणे, छळणे, त्रास देणे, जाच करणे, जीव खाणे idio., पाठीस लागणे, जाचणूक करणे g.of 0., पाठलाग करणे, तोडातोड करणे g. of o. 2 to banter over a bargain, to beat down price स्वस्त करणे, किंमत कमी करणे. B.3. जमिनीत पाळ करून राहाणारे कोल्ह्याएवढें एक चतुष्पाद जनावर n. 2 (बॅजर जनावराच्या केंसाचा) कुंचला m, लहान बरास m.(ह्याच्या कारागिरीत उपयोग होतो). Badg'er-Daiting बॅजर नांवाच्या चतुष्पादाला त्याच्या बिळांतून हुसका. पण्याकरितां कुत्रे सोडण्याचा खेळ m. Badger-dog n. लहान पायाचा व मोठ्या शरिराचा शिकारी कुत्रा M. हा फक्त बॅजर जनावराच्याच शिकारींत उपयोगाचा असतो. Bander-drawing n.शिकारी कुत्र्यांकडून बॅजर जनावराला ल्या बिळांतून बाहेर हसकावनलावणे. Badger-legg उच सखल पायांचा. Badgerer n. हल्ला करणारा. 2 जाचणारा. Badg'ering n. Badg'erly adv. To overdraw one's badger( in humorous reference to badger-drawing) पेढीवरून आपल्या जमेपेक्षा जास्त रकम उचलणे.