पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खाणे, जुमान m. n, खाणे,जुमानणे]. A. u. t. (पूज्यभावासह. भीति उत्पन्न करणे, दाब m-दबदबा m-दरारा m-&c. बसवणे, धाक m. दाखविणे, जरव f-धमकी f-देणे-दाखविणे. Aweless, Awless a. ज्याचा दरारा बसत नाही असा. Awe'lessness n. Awe'some, Aw'some a. Awe'. strike u. t. see Awe. Awe'struck a. धाक बसलेला, दरारलेला. Awful a. धाकाचा, सादरभीतिजनक, दराज्याचा, दरदयाचा, जरबेचा, वचकाचा, वचक्याचा, इव्रतीचा, धाक घालायाचा, धाक बसवायाजोगा-सारखा, जरबी, अघोर. २ अघोर, दारुण, भयंकर. ३ अवाढव्य प्रमाणाचा, अजस्र. Awfully adv: फार मोठ्या प्रमाणानं, भयंकर प्रकारे, &c. Awfulness n. सादरभीति. २ दबदबा m, दाब m, इ(ब)भ्रत , दरारा m, दगदगा (?) m, जरब f. सलाबत f.
Aweary (a-wéri) a. थकलेला, कंटाळलेला. Awearied a. same as weary.
Aweather (a-wether) a. or adv. गलबताच्या ज्या बाजूवर वारा वाहतो तिकडचा, पवनाभिमुख. The reverse of 'a-lee' applied to the position of a ship's helm where its tiller is moved to the wind-ward side of the ship.
Aweigh (a-wa') adv. भुइसांड केलेला, उचलण्याच्या स्थितीत; as, An anchor is A. when the strain on the cable has just raised it from the bottom.
Awhile (a-hwil') adv. काही काळपर्यंत, काही वेळ, अमळ, अमळसा, जरा.
Awkward (awk'ward) [A. S. in & back-handed manner.] a. clemsy अडाणी, अनाडी, आडमूठ, आडमुठ्या, आडकसबी (?), नाकसबी, घसक्या, घसव्या, अवसुती, अवसुत्या, गवत्या, काबाडी(ड्या), काबाडकामी, हेंगाडा, दुघड (?), (गव्हार), गंवार, झोडकाम्या, बेहिकमती, बेहुनरी, अकुशल, अपटु. The A. and rude,-compreh. अडाणी कबाडी m. pl. गवतेगोमाजी m. pl. २ (of things) धोबड, ओबडधोबड or आबडधोबड, बेडौल, बोजड, बेढब, बेडौली, गैरबेताचा, ढोबळ, अवसुती. ३ unpleasant, disagreeable, Auntoward, &c. अवघड, कठीण, अडचणीचा, नडीचा, गैरसोईचा.. Awkwardish a. Awkwardly ade. (v. A. l.) अडाण्या-अनाड्यासारखा, अडाण्यापरी, अडाणीपणानें, अकुशलतेने. Awkwardness n. (v. A. l.) अडाणीपणा m. or अडाणपणा m, अनाडपणा m, आडमठेपणा m. &c., अकौशल्य n, अकुशलता f, अपटुताई f. २ ओबडधोबडपणा m, 'ढोबळपणा m, बेडौलपणा m, बेडौली f. ३ अवघडपणा m, कठिणपणा m. ANI (awl) n. आरी, आर, टोपण , टोपणे n. To bore with an A. (टोपण) टोपणे, टोपसणे.. Awn (awn). (गवताचे-धान्यावरचे) कूस M, कुसूं , कसळ . २ bot. तृणवीतील फळावरील फडीच्या आकाराचे आच्छादन n-शूक n. Awn'y a. ज्याला भूस किंवा कसें फार आहेत असे, फार भुसाचा, भुसाळ.
Awning (awning) n छत n (u. बांध), चांदणी f, आ-