पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1678

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to (-ला) प्रतिकूल होणे असणे, (शी) विरोध m. धरणे करणे, (ध्या) उलट फिरणे असणे होणे. To go ahead (a) to go in advance (सर्वाच्या) पुढे जाणे, अघाडी f. मारणे. (b) to go on, to proceed, to make progress पुढे जाणे, प्रगति होणे g. of s. करणे, वृद्धि f पावणे. To go aside (s) to withdraw, to retire माघार घेणे खाणे, परतणे, परत फिरणे, (आतून) निघणे आंग काढणे. (b) to go from what is right, to err भ्रष्ट च्युत होणे, च्यवणे, चुकणे, चुकीच्या मार्गास लागणे जाणे, चूक f, भूल f, करणे, वहावणे (fig.), घसरणे (fig. ). To go back on (a) so retrace ( one's path or footsteps ) आल्या मार्गाने परतणे -परत फिरणे, परत जाणे, (आपले) पाऊल परत मागे घेणे, त्याच पायीं परतणे, आल्या वाटेने जाणे, (आपले म्हणणे शब्द इ०) मागे घेणे. To go below (a) to go below deck (आगबोटी तील) खालच्या मजल्याला जाणे. To go between (a) to interpose or mediate between parties मध्यस्थी किरणें, मध्यस्थ m. होणे, (दोन पक्षा) मध्ये पडणे, तिऱ्हाइताच्या नात्याने बोलणे. (b) (in a bad sense) to pander भडवेगिरी f. करणे, कुंटणपणा m. करणे. To go beyond, See under Beyond. To go by (-time ) to pass away unoticed जाणे, मागे पडणे. केव्हाच निघून जाणे, न समजता निघून जाणे. To go by the board naut. to fall or be carried overboard जहाजाघरून खाली (पाण्यांत समुद्रात) पडणे. To go down (a) to descend (खाली) उतरणे, खाली जाणे येणे. (b) to go below the horizon (as the sun) (सूर्य) क्षितिजाखाली जाणे उतरणें, मावळणे, अस्तास जाणे, अस्त पावणे, अस्त होणे g. of s. (c) to sink, to founder ( said of ships) बुडणे, दुखणे, पाणी भरल्यामुळे (जहाज) पाण्यांत तळाशी जाऊन बसणे, (-ला) जलसमाधि मिळणे (fig.). (d) colloq. to be swallowed (literally or fig.) घशाखाली जाणे -उतरणें, खाल्ले गिळले जाणे, पचणे, चालणे, पुरवणे; as, " Nothing so ridiculous, ... ... but it goes down whole with him for truth." To go far (a ) to go to a distance दूर लांब अंतरावर जाणे, लांबीच्या पायावर जाणे, लांब मजल मारणे. (b) to have much weight or influence (-चें) बरेंच वजन पडणे, (-ला) मान मिळणे. To go for (a) to go in quest of (चा) तपास m तलास m -शोध m. करावयास लागणे, (-च्या) शोधांत फिरणे. (b) to pass for मानले जाणे, चालणे,(-ची) गणना होणे. (c) to favor, to advocate (ची) बाजू f-पक्ष m धरणे उचलणें (d) to attack, to assault (-च्या) आंगावर हल्ला करणे, आंगावर येणे. (e) to sell for (ला) विकले जाणे, (ची) किंमत येणे, (-चा) दर असणे. To go for nothing to be parted with for no compensation or result, to count for nothing फुकट -मोफत कवडीमोल होणे -जाणे, (ला) काही एक किंमत नसणें न येणे. To go forth (a) to