पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1672

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भडका होणे, (प्रीति, राग, उत्कंठा इ० कांचे) हृदयात काहूर उठणे. (b)-the countenance, plants, &c. लुसलुसणे, टकटकणे, टवटवणे, प्रफुल्लित होणे. G. v. t. (poetic) to flush, to make hot तापवणे, लालबुंद करणे, आरक्त करणे, आरक्तता आणणे. G. n. incandscence, white or red heat धक or धग f, धगधग f, रणरण f, डोंब or आगीचा डोन m, भडका or भडाका m, तेज n, दीप्ति f, जळफळ f, फणका m, फणकारा m, अहळी f, अही f, निघा m, आंच f, आग f, ताप m, -intens. धगाटा m, भडभडाट m. २ brightness of colour, redness, a rosy flush झळाळ m, झळझळाट m, झळाळी f, झकाकी f, चकाकी f, लाली f, रक्तता f,आरक्तता f, रक्तिमा m. लाल तजेला m. ३ vehemence or heat of passion, ardour ताप m, दाह m, आग भडका.m, जळफळ f, डोंब m. ४ (a) a sensation of warmth as that produced by exercise ऊब f, गरमपणा m, ताप m, तप्तता f, उष्णता f, रसरशीतपणा m. (b)-of the mouth, &c. (तोंडाची) आग f, डोंब m, भडका m, जाळ m. (c)-of the heavens at dawn रक्तिमा m, आरक्तता f, ताम्रवर्ण m. Glow after a meal, passion, &c. गुरमी f. Glow'ing a. धगधगीत, ढणढणीत, रणरणीत, फणफणीत, रसरशीत, कडकडीत, कडक, खरमरीत, चणचणीत. २ जाज्ज्वल्य, जाज्ज्वल्यमान, दीप्तिमान, देदीप्यमान , अग्निदीप्त, अग्निमय, दीप्त, ज्वलित, प्रदीप्त. ३ लुसलुशीत, टवटवीत, टकटकीत, टुकटुकीत, तुकतुकीत. ४ भळभळीत, भणभणीत, फणफणीत. ५ haring intense excitement उग्र, प्रचंड, घुस्सावाला. Glow'ingly adv. Glow-lamp n. झकझकीत उजेडाचा दिवा m. Glow-worm n. zool. सोनकिडा m. Gloze ( glāz) [ M. E. glosen, to make glosses, from M. E. glose, a gloss. ] v. i. to flatter which see. खुशामत करणे, &c. गोडगोड गोष्टी सांगणे, थापा देणे, फुसलावणे. २ to misinterpret भलताच अर्थ करून सांगणे, विपर्यास करणे, विपरीत अर्थ करणे. C. v. t. to palliate (-वर) सारवण घालणे, बोळा फिरविणे, (-ची) तीव्रता कमी करणे -मोडणे, सौम्य -नरम कमी कडक स्वरूप करणे, नरम आहे असे दाखविणे. G. n. adulation खुशामत f, जीजी f, हांजी हांजी f, वृथास्तुति f, खोटी प्रशंसा f, वाखाणणी f. Glucinum (glõõ-si'-num ) [Gr. glukus, sweet. ] n. chem. a white metal prepared from beryl ग्लुसिनम नांवाचा धातुं m. हा 'बेरिल' नांवाच्या खनिज पदार्थात सांपडतो. अल्युमिना आणि सिलिका यांशी संयुक्त झालेला असा हा धातु पाचेमध्येही आहे. Glucose ( glū'-kās ) [ See Glucinum; cf. Glycerin. ] n. a variety of sugar occurring in nature very abundantly as in ripe grapes and honey फळे, मध इ० गोड पदार्थात असणारी सांपडणारी साखर f, फल शर्करा f. ३ the trade name of a sugar-syrup obtained by the conversion of starch into sugar by