पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1537

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

refrain from proceeding थांबणे, धीर m-दम m धरणे, धीराने घेणे, काही वेळ जाऊ देणे, खळणे, राहणे. २ to refuse, to decline, to give no heed नाकारणें, न ऐकणे, (कडे) लक्ष न देणे, दुर्लक्ष करणे, कानाडोळा करणे. ३ to control one's self when provoked गय f-गम f- खाणे, मन आवरून धरणे-आवरणे, धीर धरणे, धीर खाणे. F. v. t. (a) to abstain from, to keep away from (पासून) दूर-लांब राहणे. (b) to give up सोडून देणे, सोडणे. २ to treat with indulgence or consideration गय f. खाणे, गम खाणे, (कडे) कानाडोळा करणे, (च) हवें तसं चालू देणे. Forbear'ance n. थांबणे n, राहणे n, धीर धरणे n. २ exercise of patience धीर m, दम m. ३ command of temper संयम m, संयमन n. ४ clemency गय f, गम f, क्षमा f, शांति f, मुलाजा m. Forbear'ing pr. p. a. & v. n. Forbear'er n., ( from v. i. ) धीर धरणारा, दम धरणारा, थांबणारा, धिम्मा ( in a good sense). २ (from v. t.) गम खाणारा, गय करणारा, क्षमी, क्षमावान्. Forbear'ingly adv. गम खाऊन. Forbear (forbaer') [ Tore-be-er, one who is before.] n. Scot. an ancestor, a forefather (usually in the pl.) पूर्वज m. pl., वाडवडील m. pl. Forbid (for-bid') [ For-prefix. away, and Bid.] v.t. to prohibit, to interdict मना f. करणे, नको म्हणणे, वारणे, निवारणे, निषेध m- प्रतिषेध m -करणे, वर्ज करणे. 2 to exclude from by express command, to command not ta enter (मुद्दाम सांगून) बंद करणे, बंदी किंवा मनाई करणे. ३ to hinder, to obstruct अडथळा m अवरोध m-हरकत f- प्रतिबंध m आणणे करणे. ४ (obs.) to accurse शिव्या देणे. Forbid'dance n. (obs.) (Milton.) हरकत f, मनाई f, प्रतिबंध m, प्रतिषेध m, निषेध m. Forbid'den a. प्रतिषिद्ध, वर्जित, निवारलेला, मनावर्ज केलेला, वारित, निवारित, परिवर्जित, प्रत्याख्यात. २ (as used of food) निषिद्ध, अविहित, हराम. Forbid'denly adv. (Shakes.) Forbid'der n. मना करणारा, निषेध करणारा, निवारक, निवारणकर्ता, निवारणकारक, वर्जक, परिवर्जक. Forbid'ding a. मना करणारा, निषेध करणारा, निवारक. २ repulsive तिटकारा आणणारा, त्रासजनक, किळस आणणारा, अमंगल, अप्रसन्न. F.n. निवारणें n, मनाई f, वारण n, निवारण n, निषेध m, प्रतिषेध m, परिवर्जन n, प्रत्याख्यान n. Forbid'dingly adv. Forbid'dingness n. Forbidden fruit (a) निषिद्धफळ n. (b) any coveted unlawful pleasure (so called with reference to the forbidden fruit of the Garden of Eden) निषिद्धसुखाची हांव f, निंद्य सुखाचा लोभ m. [एडन बागेतील.ज्ञानवृक्षाचें फळ खाऊ नका असा देवाने आदम व ईव्ह यांना निषेध केला होता, तरी त्यांनी ते निषिद्ध फळ खाल्ले व त्यामुळे मानवजातीस दुःख झाले अशी गोष्ट बायबलांत आहे. यावरून निषिद्ध फळ ह्मणजे निषिद्ध सुखाचा लोभ हा अर्थ झाला आहे.] Force (fawrs) [O. Fr. force-L. L. fortia - L. fortis,