पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1518

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or पांवा m. २arch. a channel. of curredl sections नकशीच्या खांबांतली पन्हळीf, खांचणीf, बलकीf. ४ a long French breakfast.roll सकाळच्या न्याहारीची फ्रेंच भाकरीf. F.v.i. to play on a flute बासरीf. वाजविणे. F. v.t. to play, whistle or sing with a clear, soft note, like that of a flute मुरलीप्रमाणे मंजुळध्वनि काढन वाजविणे गाणे. Fluted a. clear and mellow स्वच्छ आणि मंजुळ; as, "F. notes." Fluter n. Fluting . खांचणीf, बलकीf. Flutist n. बांसरी वाजविणारा m.
Flutter (flut-er) [A. S. flotorian, to float about, -flot, the sea. ) v. i. to move or flap the wings without flying or with short flights पंख फडफडवणे, फडफडणे, फडफड वाजणे. २ to more with quick vibration (as a sail) फडफडणे, (निशाण-शीड इ" फडकणे. ३ to move about with bustle फडकत चा लणे-जाणे, पोकळ डौलाने इकडे तिकडे फिरणे, फडका. वणे, फडकणे. ४ to be in agitation, to move irregularly, to be in uncertainty फडफडत हालणे-चालण -असणे, चलबिचल-संशयित होणे. ५ to palpitate : the heart) धडधडणे, धडधड वाजणे -होणे, (फडफड)उडणे . F. v. t. to vibrate or move quickly फडफडावणे, फडकावणे. २ to drive in disorder to throw into confusion (-चा) घोटाळा उडविणे, (ला) घोटाळ्यांत टाकणें -पाडणे. F. or Flut tering n. flapping फडफडf. फडफडणेn, फडकणेn , फडत्कारm. २(of the heart)quick irregular motion धडधड f, धडधडी f. Flut'tered pa. t. Flut'teringly adv. फडफडत, फडाफड.
Flux (fluks) | Fr. flux, L. fluxus, -fluere,to flow.] n. the act of flowing, quick success वाहणेn , प्रवाह m, स्त्राव m, रीघf (as मनुष्या रीघ). २ the setting in of the tide towards shore चढ m, (किनाच्याकडे जाणारा भरतीचा) प्रव m, (किनाऱ्याकडे भरतीचे पाणी) चढणे . ३ the of being liquid, fusion प्रवाहित्व , रसात्मक संमिश्रण , संप्रवहन , दोन धातूंचा एकरस करणें n. ४ any substance 'used to promote the just metals संमिश्रक (द्रव्य n), ज्याने दोन धातूप होऊन एकजीव होतात असा क्षार m. ५ the discharge of a fluid from the bowels or other part (a) , ढेंडळf, ढेंडाळीf, ढगळf, डरंगळf, डरगळf. (b)स्राव m. [ BLOODY F. रक्तस्त्राव m, रक्तओढ. २ रक्त एकाच बाजूला चढणे n. To HAVE A F. ढेंगाळणे, (-ला) ढाळ होणे, पोट जाणे with g. of s. F. AND REFLUX भरती आणि ओहोटीf, चढउतार m, चढ आणि उतार m. to melt, to cause to become fluid or to melt रस करणे, वितळविणे.२ to cause discharge from, " Purge जुलाब देणे करविणे, (आंतून काढून टाकुन )साफ करविणे, निचरवणे, निचरा करणे. Fluxion n. the act of flowing वाहणेn , स्रावm , प्रवाहm.