पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1504

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

prob, from L. flectere, to bend.] v. i. to draw back or turn aside from a course of action, a duty, or enterprise ), to draw back through failure in courage, endurance or resolve, to shrink back माघार f. घेणे, कचरणे, कचf. खाणे, कचणे, कचकणे, कचकरणे, हटणे, मागे पाहणे -होणं, सोडतें n काढतेंn . घेणे, पाऊल n. मागे काढणे, परावृत्त -परान्मुख होणे. F. n. the act of flinching माघार f, हारf, कचf, कच खाणें n. Flincher n. कचरणारा, कच खाणारा. Flinching pr. a. Flinchingly adv. कचरत.
Fling (fling) [Icel. flengja; Swed. flenga, to strike.]v.t. ( frequently with about, aside, away, by, out, up, &c.) to throw, to cast, to toss, to hurl झुगारणे, झुगारून देणे, जोराने झोंकणे, फेंकणे, घालणे, टाकणे, भिगारणे, भिरकावणे. [To F. ONE'S SELF UPON or into, to fling one's energies into, to enter upon vigorously, to abandon oneself to (-आंत) पूर्ण लक्ष घालणे, मोठ्या जोराने सुरू करणे. To F. ONE'S SELF UPON ( A PERSON ) to confide one's self unreservedly to (वर) सर्वस्वी भरंवसा ठेवणे, (एखाद्या कामांत) उडी घालणे, कामास वाहून घेणे. To F. ABOUT' चोहोंकडे फेंकणें-पसरणे. To F. a way, to reject, to discard सोडून देणे; AS, "To F. AWAY AMBITION." To F. DOWN उद्दामपणाने खाली फेंकणे. २ खाली पाडणे. ३ नाश करणे. To F. OFF to baffle in the chase, to throw off the scent (पाठलाग करीत असतांना) चकविणे-फसविणे, भलत्याच मार्गाला लावणे. To F. OPEN झपाट्यासरसा -झोकासरसा-झोक्याने झपाट्यानें-&c. उघडणे. To F. OUT ( A LIMB &c. ) असडणे, झटकावणे, हिसडा m -असडा m -झटका m -झटकारा m. देणे. To F. up to relinquish, to abandon सोडून देणे ; AS, To F. UP DESIGN. To F. IN ONE'S TEETH (बोलण्यांत एखाद्याच्या) त्याच्याच विचारसरणीने किंवा शब्दाने त्याचे दांत पाडणे .] २ to throw with violence or hostile intent (शत्रुबुद्धीनें-दुष्ट बुद्धीनें) फेंकणे, सोडणे, टाकणे, फेकणे; as "To F. an arrow.” ३ to prostrate ( hence) to baffle खाली फेकणे -पाडणे, पालथा-उताणा-पाडणे, चीत करणे, पराजित करणे. F. v. i. to throw, to flounce (आंग) धाडकन् खाली पाडणे, फेंकून देणे, आदळआपटf. करणे, हातपाय m, pl. पाखडणे,-आपटणे -आदळणे, -झाडणे. २ ( with out) lash out दुगाण्याf.pl. -दुलाच्याf. p l-दुमच्याf. pl -पिछाड्याf. pl. झाडणे.३ to utter abusive language, to sneer शीवीगाळ करणे, तोंडाचा पट्टा चालविणे. ४ to rush with violence जोराने घुसणे. Flinging pr'. p. & v. n. Flung pl. t. & pa. p. Fling n. a throw a flounce फेंकf, (दुगाणीचा) तडाखा m, टापf. २ an expression of sarcastic scorn टोला m (.fig ). To have one's F. to enjoy one's self to the full मनसोक्त चैन करणें-चालविणे, मजा मारणे.
Flint (flint) [A. S. flint, Dan. flint, Gr. plinthos, a brick.] n. ( a ) a kind of hard stone