पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निम्न करणे, जमीनदोस्त करणे, खचविणे, नाउमेद करणे. ३ to render stale बेचव करणं. ४ mus. to lover' the pitch of, to cause to sound less sharp (तबला इ०) उतरणं, बोद करणे, नीच स्वरांत आणणे. F.v.i. to grow flat, depressed, vapid चपटा होणे, चेपटणे . Flat'ting n. the process or operation of making flat, as a cylinder of glass by opening it out चपटा -सपाट करणे . २ the process of forming metals into sheets by passing it between rollers धातूंचे पत्रे करण्याची पद्धति f. Flattish a. somewhat flat सपाटसर. Flat-wise adv. थपी. (v. लावणे.)
Flatter (flat'-er ) [ O. Fr. flatter (Fr. flatter;) of Flatter शब्दाची उत्पत्ति संशयित आहे. जुन्या फ्रच भाषेत Flater (चालू फ्रेंच Flatter ) चा अथे गुळ गुळीत करणे, हाताने थोपटणे, कुरवाळणे असा आहे. फ्रेंच Flatorie शब्दाचा अर्थ इंग्रजी Flattery असा आहे व फ्रेंच Flatere चा अर्थ Flatterer असा आहे. तेव्हां ह्या दोन शब्दांवरून फ्रेंच Flater शब्दाचा अर्थ इंग्रजी Flatter आला असावा असा एक तर्क आहे.]v.t. to soothe with praise and servile attentions, to cajole, to wheedle हांजी हांजीf. -आर्जव n-खोटी स्तुतिf खुशामत करणे, तोंड पाहन -तोंडासारखं-तोंडापुरतता. देखलें -तोंडदेखणें -तोंडदेखें बोलणं, जीजी करण-म्हणणे. [ To F. ONE'S SELF UPON अहंकार दाखविणे, आपली आपण बडेजाव करणे, अकड अभिमान बाळगणे -भोगण-धरणे g. of o.] २ to speaks what is agreeable रुचेल ते बोलण, प्रिय मापण बोलणं.३ to praise falsely खोटी स्तुति करणे. ४ to gratify आराधना करणे, संतोपविणे, सतुष्ट करणं. ५ to raise false hopes in खोटी आशा उत्पन्न करणं. ६ to give too favorable an idea of (आह त्यापेक्षा जास्त चांगली कल्पना देणे: as, "His portrait F. s him." F. n. चपट्या तोंडाचा घण m. २ चपटी जंतरपट्टी f Flatterer n. खुशामत करणारा, फाजाल स्तुति करणारा, तोंडासारखं बोलणारा, संतापाव हांजी हांजी करणारा, खोटी आशा उत्पन्न करणारा, Flattering pr. p. Flatteringly adv. Flat'tery हाजीहांजी, खुशामत, आर्जव n, लाडीगोडीf. मिथ्या प्रशंसा f, तोंडासारखें -तोंड देखणे-तोंडापुरते बोलणें n.
Flatulent ( flat'-ü-lent) | Fr.,-L. L. flatulentus -L. flare, flatum, to blow.] a. generating or apt to generate gas in the alimentary canal, causing wind वातकर, वातकारक, वावडा, वातुल,वातुड, पोटांत वात उत्पन्न करणारा, पोटांत दब्ब करणारा: २ (a)(of a disease ) attended with or caused by accumulation of gases in the alimentary canal वात उत्पन्न करणारा, वाताने फुगलेला, वातयुक्त वातजन्य; as, “F. asthma. F. caulis. F. eructation (b) (of persons ) troubled with flatulence पोटातील वाताने पिडलेला -आजारी, वातग्रस्त, वातप्रधान,वातप्रकृतीक, वातप्रकृतीचा. ३ (fig.) instate or puffed up, windy, empty, vain, pretentious फुगलेला ,